Oppenheimer India Controversy : भारतामध्ये 'ओपनहायमर' वरुन झाला होता मोठा वाद, काय होतं कारण?

नोलनच्या ओपनहायमरची भारतामध्ये चर्चा झाली होती. त्यावरुन मोठा वादही झाला होता. | There was a big controversy in India on 'Oppenheimer', Know what was the reason...
Oppenheimer Movie News
Oppenheimer Movie Newsesakal

Oppenheimer Oscar winner 2024 : जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमरची गेल्या वर्षी मोठी क्रेझ होती. तो चित्रपट एवढा का लोकप्रिय झाला त्याचं उत्तर आजच्या ऑस्कर सोहळ्यातून मिळाल्याचे दिसून आले आहे. एक दोन नव्हे तर या चित्रपटाला तब्बल १३ नामांकनं होती. त्यापैकी या चित्रपटानं ७ पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवल्याचे दिसून आले आहे.

नोलनचा ओपनहायमर भारतात जेव्हा ओपनहायमर जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा त्यावरुन वाद झाला होता. भलेही या चित्रपटानं भारतातून मोठ्या प्रमाणावर कमाई केली असेल मात्र त्यातील एका दृश्यानं भारतीय प्रेक्षकांना विचलित केले होते. त्यावरुन अनेकांनी नोलनला ट्रोल केले होते. पण नोलनची आपला चित्रपट आणि त्यातील प्रसंग याबाबत ठाम भूमिका होती. त्यानं त्या दृष्यामागील वैचारिक भूमिका स्पष्ट केली होती.

एका प्रेमप्रसंगातून भगवद्गगीतेतील दाखला नोलननं दिला होता. तो भारतीय प्रेक्षकांच्या भावना दुखावून गेला असे बोलले जाते. ओपनहायमरला त्या प्रेमाच्या उत्कट प्रसंगी जे आठवते ते तो लागलीच भगवद्गगीतेमध्ये शोधू लागतो. असे त्या प्रसंगातून सांगण्यात आले होते. तो वाद बराचकाळ सुरु होता. ओपनहायमरनं त्याची भूमिका मांडताना भगवद्गगीतेचा आधार घेतला होता. ते दिग्दर्शकानं यावेळी मांडण्याचा प्रयत्न केला होता.

नोलनच्या या चित्रपटामध्ये ओपनहायमरची भूमिका ही सिलियन मर्फीनं केली होती. आता त्याला या भूमिकेसाठी ऑस्कर मिळाल्याचे दिसून आले आहे. तसेच नोलननं देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. नोलनच्या ओपनहायमरमधील त्या सीनवर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. नोलन आम्हाला तुझ्या चित्रपटांविषयी आदर आहे. मात्र तो तू सीन चित्रपटातून हटवावा. अशी मागणी करण्यात आली होती.

Oppenheimer Movie News
Oscar Winner 2024 : अखेर 'ओपनहायमर'नं कोरलं 'ऑस्कर'वर नाव! 13 नॉमिनेशन, 7 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये ओपनहायमरला यु ए सर्टिफिकेट देण्यात आले होते. त्यातील काही सीन्स हे सेन्सॉर बोर्डानं हटविले होते. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com