esakal | पावसाचे आगमन आणि गझल सम्राट पंकज उधास यांचे मराठी पाऊसगीत...
sakal

बोलून बातमी शोधा

ranghdhnaucha zula

पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. मंदार चोळकर यांनी हे गीत लिहिले असून त्याला संगीतसाज संगीतकार अशोक पत्की यांनी चढविला आहे.

पावसाचे आगमन आणि गझल सम्राट पंकज उधास यांचे मराठी पाऊसगीत...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : उन्हाळ्यांमध्ये कंटाळलेल्या लहान-थोरांना पाऊस कधी पडतोय असे झाले होते आणि आता त्यातच पावसाने आमगन झाले आहे. पावसामुळे लहानथोराच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात आहे. आता त्यातच हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अपेक्षा म्युझिकने पावसाचे गाणे आणलेले आहे, 'रंगधनुचा झुला' असे त्या गाण्याचे नाव आहे. पावसाळ्यात प्रेमाचे  रंग अधिक गडद करील असे हे गाणे आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट पंकज उधास यांनी पहिल्यांदाच पावसाचे गाणे मराठीत गायलेले आहे.  

वाचा ः कॉफीतील वादळानंतर आलो ठिकाणावर!! वाचा कोणी दिली कबुली...

पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. मंदार चोळकर यांनी हे गीत लिहिले असून त्याला संगीतसाज संगीतकार अशोक पत्की यांनी चढविला आहे. गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास या गाण्याबबद्दल म्हणतात, ''मराठी भाषेत गाणे गाण्याचे माझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीत असून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहील.''

वाचा ः आडनावामुळे गर्भवती महिलेला कोरोना; चुकीच्या अहवालामुळे नाहक मनस्ताप​

गायिका कविता पौडवाल म्हणाली, की 'रंगधनूचा झुला' या गाण्याबद्दल बरीच उत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीत भाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठी गीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहोचेल.'

वाचा ः लोकल सुरु होणार का? मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती...

याबाबत 'अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक' चे अजय जसवाल म्हणाले, की, "संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्या निमित्ताने 'रंगधनूचा झूला' हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझल उस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत  गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा या युगुलगीताला साज चढवला आहे.