Actor Dolly Sohi Passed away: 'हिटलर दीदी' फेम अभिनेत्री डॉली सोहीचं निधन, बहिणीच्या मृत्यूनंतर ४८ तासांनी घेतला अखेरचा श्वास

Actor Dolly Sohi Passed away: टीव्ही स्टार डॉली सोही हिचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.
Actor Dolly Sohi Passed away
Actor Dolly Sohi Passed awayEsakal

मनोरंजन क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे. 'कलश', 'हिटलर दीदी', 'देवों के देव महादेव' यासह अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केलेली अभिनेत्री डॉली सोहीचं निधन झालं आहे. ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देत होती. वयाच्या 48 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिची बहीण अमनदीप सोही हिचा ४८ तासांपूर्वी मृत्यू झाला होता.

डॉली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती, तर तिची बहिण अमनदीपचा मृत्यू कावीळमुळे झाला होता. डॉली सोहीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

आज पहाटेच्या सुमारास तिचे निधन झाले. आज दुपारीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉलीचा भाऊ मनू याने दिली आहे.

Actor Dolly Sohi Passed away
Kerala State OTT Platform : केरळ राज्य सरकारनं सुरू केला 'ओटीटी प्लॅटफॉर्म'! जाणून घ्या काय आहे नियमावली?

डॉली सोहीची तब्येत गेल्या वेळेपेक्षा खूपच खराब झाली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिने तिच्या चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले.

Actor Dolly Sohi Passed away
Anant Radhika Pre Wedding : 'डायमंड बॅग पासून अलिशान कारपर्यत...' अनंत-राधिकाला कुणी काय काय दिले, सगळ्यात महागडं 'गिफ्ट' कुणाचं?

डॉलीला प्रकृतीच्या समस्येमुळे केमोथेरपी घेतल्यानंतर बराच काळ शूटिंग करता न आल्याने तिला 'झनक' शो सोडावा लागला होता. अभिनेत्रीने कॅनडास्थित भारतीय अवनीत धनोआशी लग्न केले होते, मात्र जेव्हा ती आई झाली तेव्हा दोघांमध्ये तणाव वाढू लागला. डॉलीला एक मुलगी आहे.

Actor Dolly Sohi Passed away
Maidaan Trailer : भारत एकेकाळी फुटबॉलमध्ये 'बाप' होता? अजय देवगणच्या 'मैदान' चा जबरदस्त ट्रेलर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com