Pathaan Screeing In Pakistan : पाकिस्तानमध्ये दाखवला 'पठाण', झाला राडा! लपुन छपून सुरु होतं...

शाहरुखच्या पठाणबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याचा पठाण नावाचा चित्रपट पाकिस्तानात दाखवला गेला आहे.
Pathaan Screeing In Pakistan
Pathaan Screeing In Pakistanesakal

Pathaan Shah Rukh Khan Movie Screening in Pakistan : शाहरुख खानचा पठाण केवळ देशात नाहीतर जगभरामध्ये विक्रमी कमाई करताना दिसतो आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पठाणनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहत्यांकडून प्रचंड कौतूकाचा वर्षाव होतो आहे. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या शाहरुखच्या या चित्रपटावरुन मोठ्या प्रमाणात वादही समोर आला आहे.

शाहरुखचे चित्रपट आणि पाकिस्तानमधील त्याचे चाहते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. किंग खानचा केवळ भारतातच नाहीतर पाकिस्तानमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. म्हणून तर पाकिस्तानील दिग्गज कलाकार देखील त्याचे कौतूक करताना दिसून येतात. अशातच शाहरुखच्या पठाणबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याचा पठाण नावाचा चित्रपट पाकिस्तानात दाखवला गेला आहे.

Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात बंदी आहे. तर काही चित्रपटांवर कायमची बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील शाहरुखचा पठाण हा पाकिस्तानात दाखविण्यात आल्यानं अनेकांचा संताप झाला आहे. ज्या कंपनीकडून तो दाखविण्यात आला त्यांनी तो बेकायदेशीररीत्या दाखवला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये शाहरुखच्या त्या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाल्यानं ती बातमी समोर आली आहे.

Pathaan Screeing In Pakistan
Salim Khan : 'स्टार झाल्यानंतर अमिताभ यांनी कधीही...' सलमानच्या वडिलांना अजुनही वाईट वाटतं!

सिंध फिल्म सेन्सॉर बोर्ड यामुळे चर्चेत आला आहे. भारतीय चित्रपट अधिकृतरित्या पाकिस्तानात दाखवणे यावर बंदी असताना पठाण चित्रपट व्हायरल झाला कसा सवाल आता पाकिस्तान प्रशासनानं उपस्थित केला आहे. किंग खानच्या पठाणनं जगभरातून तब्बल आठशे कोटींची कमाई केली आहे. भारतातून सर्वाधिक कमाई करणारी बॉलीवूड फिल्म म्हणून आता पठाणचे नाव घेतलं जातंय.

पाकिस्तान आणि बॉलीवूड कनेक्शन यांचीही नेहमीच चर्चा होत असते. पाकिस्तानात शाहरुख, सलमान, आमीर खान यांचा चाहतावर्ग मोठा आहे. दोन देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे त्या देशातील कलावंतांना भारतामध्ये काम कऱण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होत नाही. आता पाकिस्तानातील एका कंपनीनं वेगळी शक्कल लढवून शाहरुखच्या पठाणचे स्क्रिनिंग केले. ते त्या कंपनीला महागात पडले आहे.

Pathaan Screeing In Pakistan
Pathaan: कोणी म्हणतंय ७०० तर कुणी ८०० कोटी..शाहरुखनं अखेर सांगितली 'पठाण'ची खरी कमाई..आकडा ऐकून चाहते हैराण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com