
बहुचर्चित 'RRR' सिनेमा पहा फक्त 1 रुपयात; ऑफरची होतेय चर्चा
भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकी धारण करणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) आज आकर्षक यूपीआय-आधारित ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींना ज्युनिअर एनटीआर व राम चरण अभिनीत – 'RRR' सिनेमाचे वाऊचर्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. पेटीएम युजर्स पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून ९७११६५६५६५ या क्रमांकावर १ रूपया त्वरित मनी ट्रान्सफर करत २१ मार्च ते २७ मार्चपर्यंत जवळपास १५० रूपये किंमतीचे मोफत 'RRR'सिनेमाचे वाऊचर्स जिंकू शकतात. यानंतर पेटीएम अॅपच्या माध्यमातून 'RRR' सिनेमाची तिकिटे बुक करताना युजर्स हे वाऊचर्स रिडिम करू शकतात. यासाठी त्यांना पेटीएम अॅपवर तिकिट बुक करताना वाऊचर प्रोमो कोड प्रविष्ट करावा लागेल.

Paytm...image
पेटीएमचे प्रवक्ता यासंदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, "आम्ही भारतामध्ये डिजिटल पेमेंट्सचा अधिक प्रमाणात वापर व स्वीकृतीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या पेमेण्ट साधनांसह आम्ही अधिकाधिक युजर्सना त्यांच्या आर्थिक प्रवासामध्ये सक्षम करण्याची आशा करतो. पेटीएम यूपीआय अत्यंत गतीशील व सुरक्षित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतं. आमच्या युजर्सचे सिनेमांप्रती प्रेम पाहता आमची 'RRR' सिनेमाच्या वाऊचर्ससाठी नवीन यूपीआय ऑफरसह कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा आहे."
हेही वाचा: ऐश्वर्या रजनीकांतनं अखेर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं हटवलं धनुषचं नाव
'RRR हा बहुप्रतिक्षित भारतीय सिनेमा आहे, जो जगभरात २५ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. एसएस राजामौली यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमामध्ये ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट(Alia Bhatt), ओलिविया मॉरिस, अलिसन दूडी, श्रीया सरण आणि रे स्टिव्हन्सन असे प्रतिभावान कलाकार आहेत. त्यामुळे जर पेटीएमच्या माध्यमातून एक रुपयात मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा पहायला मिळाला तर चाहत्यांसाठी सुवर्णसंधीच म्हणायला लागेल.
Web Title: Pay Only 1 Rupees To Watch Rrr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..