...त्यापेक्षा गरीबांना मदत करा, पाहा सोनू सुद असं का म्हणाला?

sonu sood
sonu sood

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी परत जाण्यास मदत केल्याच्या कार्याबद्दल अभिनेता सोनू सूद सध्या फार चर्चेत आहे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी सोनूने घेतली आहे. यामुळे राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत प्रत्येक जण सोनूच्या निःस्वार्थ कृत्याबद्दल त्यांचे कौतुक करीत आहे.  तसेच जे सोनूकडून मदत मागत आहेत त्यांच्या ट्विटला तो प्रत्युत्तर देत आहे. शेवटचा मजूर त्याच्या घरी पोहचेपर्यंत तो शांत बसणार नाही असेही त्याने सांगितले आहे. मजूरदेखील त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊन त्यांच्याकडून मदत मागत आहेत. अशातच त्याने केलेल्या या मदतीने मजूर खूष होऊन त्यांनी बिहारमधील सिवान येथे सोनूचा पुतळा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच्या एका चाहत्याने ट्विटववर ट्विट करत याची माहिती दिली आहे.

सध्या या काळात सोनू सर्व परप्रांतीय मजुरांना त्याच्या घरी पोहचवण्यासाठी बरीच मेहनत करत आहे. अशातच त्याचा बिहारमध्ये एक पुतळा उभारणाची तयारी सुरू असल्याची माहिती एका चाहत्याने दिली आहे. प्रफुल्ल कुमार यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'बिहारमधील सिवान येथे लोक तुमचा पुतळा उभारण्याच्या तयारीत आहेत. सलाम सर, खूप प्रेम.' यावर सोनू रिट्विट करत म्हणाला की, 'माझी मूर्ती बनवण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांनी गरीबांना मदत करा.'

त्याच्या या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत. सोनू करत असलेल्या या मदतीने मजुरांना दिलासा मिळाला असून ते आनंदी आहेत.

राजकीय नेत्यांकडून कौतुक

देशभरात सोनूचे कौतुक होत असताना काही राजकीय नेत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनूचे कौतुक केले आहे. त्यांनी सोनूचे कौतुक करत एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'तुला एक सहकारी म्हणून जाणून घेण्याची संधी मला दोन दशकांपासून मिळाली. आता तू एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण या कठीण काळात तू ज्या पद्धतीने गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहेस त्याचं मला फार कौतुक आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल तुझे आभार.' अशा प्रकारे स्मृती यांनी सोनूचे कौतुक केले आहे. याशिवाय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ही ट्विट करत सोनूचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,' सोनू सूद ज्या मजुरांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करत आहे. त्याच्याकडून जितक्या मजुरांना मदत करता येईल तितकी तो करत आहे. रुपेरी पडद्यावर खलनायचे काम करणारा सोनू प्रत्यक्षात मात्र हिरोचे काम करत आहे.' एक हीरो म्हणून जयंत पाटील यांनी सोनूचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन सोनूने काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. विशेष म्हणजे तो ही सोय विनामूल्य देत आहे. काही ठिकाणी सोनू स्वतः उपस्थित राहून मजुरांची  चौकशी करत आहे. 

people wants to make statue of sonu sood in bihar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com