"काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका"; अनुपम खेर केजरीवालांवर भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the kashmir files, anupam kher

"काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका"; अनुपम खेर केजरीवालांवर भडकले

गेले काही दिवस वादाचे कारण ठरत असलेला आणि बॉक्स ऑफिस वर दर्जेदार कमाई करत असलेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (the kashmir files) वरून पुन्हा नवीन वाद निर्माण झाला आहे. आता या वादाच्या टोकाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांनी या चित्रपटाविषयी केलेल्या वक्तव्यावरून अनुरूप खेर यांनी त्यांना सुनावले आहे.

हेही वाचा: द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने १३ दिवसात जवळपास २०० कोटींहुन अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रेकॉर्ड मोडण्यासोबतच वादामध्येही हा चित्रपट पुढे आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनपासून ते त्यावर व्यक्त केलेल्या मतांवरून रोज नवे खटके उडत आहेत. आता अरविंद केजरीवाल यांनीही 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाला सल्ला दिला आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री कारण्यासोबतच त्यांनी आणखी एक पर्याय सुचवला ज्यावरून हा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांनी केजरीवालांना धारेवर धरले.

anupam kher, the kashmir files

anupam kher, the kashmir files

हेही वाचा: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना

त्यांनी ट्विट करत या वक्तव्याचा निषेध केला आहे. 'अब तो दोस्तों 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा हॉल में ही जाकर देखना। आप लोगों ने ३२ साल बाद #KashmiriHindus के दुःख को जाना है। उनके साथ हुए अत्याचार को समझा है, उनके साथ सहानुभूति दिखाई है, लेकिन जो लोग इस tragedy का मजाक उड़ा रहे है। कृपया उनको अपनी ताकत का एहसास कराएं।' अशा शब्दात अनुपम खेर यांनी केजरीवाल यांचा समाचार घेतला आहे.

'बत्तीस वर्षांनी काश्मिरी पंडितांचे दुःख जगाला कळले आहे. लोक त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत आहेत. अशा गंभीर प्रसंगातही काहीजण त्याची थट्टा उडवत आहेत. त्यांना आपल्या ताकदीची जाणीव करून द्यायला हवी,' असा इशारा खेर यांनी दिला आहे.

Web Title: Anupam Kher Solid Reply To Arvind Kejriwal Over The Kashmir Files

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top