the kapil sharma show, kapil sharma
the kapil sharma show, kapil sharma google

द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत

जगभरात लोकप्रिय असलेला 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. याला स्वतः कपिलच जबाबदार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर आहे.
Published on

गेल्या काही वर्षात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात 'द कपिल शर्मा शो'चा डंका वाजला आहे. घराघरात हा कार्यक्रम आवर्जून पाहिला जातो. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून कपिल शर्मा शो वादात अडकला होता. या चित्रपटाच्या कलाकारांना (the kapil sharma show news) 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रमोशनसाठी आमंत्रित न केल्यामुळे मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा चर्चेत आला आहे.

the kapil sharma show, kapil sharma
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना

ENTERTAINMENT NEWS : 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. याबाबत अद्याप कपिलने अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याच्यामुळेच हा शो बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कपिल शर्मा शो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. चित्रपटांच्या प्रमोशनसाठी दर आठवड्याला वेगवगेळे कलाकार या कार्यक्रमात येत असतात. त्यांच्या खिल्ली उडवत कपिल करत असलेली धमाल प्रेक्षकांना भावते. शिवाय त्यात सादर होणारे किट पाहणे ही पर्वणी असते. आता हा शो बंद होणार असल्याने अनेकजण हताश झाले आहे.

the kapil sharma show, kapil sharma
गाढवावरून धिंड काढली तर.. तृप्ती देसाई पुन्हा भडकल्या

कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक फोटो शेअर करून त्याच्या अमेरिका-कॅनडा दौऱ्याची घोषणा केली आहे. 'माझ्या यूएस-कॅनडा टूरची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू. हा दौरा ११ जूनपासून सुरू होणार असून ३ जुलैपर्यंत चालणार आहे,' असे कपिल ने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. कपिलच्या या पोस्टमुळे लवकरच 'द कपिल शर्मा शो' (kapil sharma) काही काळासाठी का होईना बंद होईल अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com