Peyush Bansal : 'शार्क टँक'च्या प्रसिद्ध जजनं दिल्लीत घेतलं तब्बल १८ कोटींचे घर! पियुष जाम खूश

टीव्ही मनोरंजन विश्वातील रियॅलिटी शो शार्क टँक ज्यांनी पाहिला असेल त्यांना पियुष बन्सल कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.
Peyush Bansal
Peyush Bansal esakal

Peyush Bansal of Lenskart buys house in Delhi: टीव्ही मनोरंजन विश्वातील रियॅलिटी शो शार्क टँक ज्यांनी पाहिला असेल त्यांना पियुष बन्सल कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. देशातील नवउद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम पियुष बन्सलनं केले आहे. त्यानं अल्पावधीत स्वताच्या नावाची ओळख तयार केली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

पियुष आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण दिल्लीतील नीति बागेत खरेदी केलेलं घर. लेन्सकार्ट या प्रसिद्ध ब्रँडचा सर्वेसर्वा म्हणून पियुषकडे पाहिले जाते. शार्क टँकमध्ये सगळ्यात जास्त ज्याच्या नावाची चर्चा होते त्यामध्ये पियुषचे नाव घेतले जाते. अचूक आणि तितकचं मार्मिक बोलणं हे पियुषला जमले आहे.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

पियुषला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. १८ कोटींचे घर घेणाऱ्या पियुषचं त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. घराची खरेदी पियुषच्याच नावानं झाली असून तो व्यवहार १९ मे २०२३ रोजी झाल्याचे सांगण्यात आले आहे. १८ कोटींसाठी बन्सलनं एक कोटी रुपयांची स्टँम्प डयुटी दिली आहे.

त्या कागदापत्रानुसार, बन्सलनं खरेदी केलेल्या घराचा एरिया हा ४६९.७ स्केअर मीटर असून एकुण एरियाहा ९३९.४ स्क्वेअर मीटर एवढा आहे. बन्सलनं तो बंगला सुरिंदर सिंग अटवाल यांच्याकडून खरेदी केला आहे. बन्सल विषयी आणखी सांगायचे झाल्यास तो गेल्या काही दिवसांपासून शार्क टँकमुळे चर्चेत आला आहे. त्यानं याशिवाय काही रियॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे.

Peyush Bansal
Shark Tank India 2 Scam : चेकवर नुसत्याच सह्या, पैसे कुठंय? शार्क टँकमध्ये घोटाळा?

शार्क टँक हा गेल्या काही वर्षात चर्चेत आलेला रियॅलिटी शो म्हणून ओळखला गेला आहे. त्याची लोकप्रियताही मोठी असल्याचे दिसून आले. त्यातील जज हे सोशल मी़डियावर हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनिता सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com