
Phir Na Aisi Raat Aayegi Song: अरिजितचा काळजाला भिडणारा आवाज!
Laal Singh Chaddha Movie Song Viral: हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंम्प नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक दोन (Aamir Khan) महिन्यांतर प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री करिना कपूर आणि टॉलीवूडचा विजय सेतुपतीही चित्रपटात आहे. सध्या (social media viral news) सोशल मीडियावर लाल सिंग चढ्ढामधील एक गाणे व्हायरल झाले आहे.
'फिर ना ऐसी रात आएगी' हे मोस्ट अवेटेड गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे असे म्हणणे चुकीचे (arijit singh news) ठरणार नाही. प्रीतमनं संगीतबद्ध केलेले हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे. अलीकडेच आमिर खानने सोशल मीडियावर करीना कपूर खानचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे सांगते आहे.
आमिर खानने टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर काही अत्यंत प्रतिभावान भारतीय निर्मात्यांसह लाइव्ह जात हे गाणे लॉन्च केले, यावेळी त्याने प्रेम, वियोग आणि तळमळ या मानवी भावनांवर वर चर्चा केली. काल आमिर खानने करीना कपूर खानचा एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये अभिनेत्रीने 'फिर ना ऐसी रात आएगी'ला दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे संबोधले.
लाल सिंग चड्ढाची या आधीची दोन गाणी - 'कहानी' आणि 'मैं की करां?' संगीत रसिकांच्या हृदयाला भिडली आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि गीतकार यांच्या नावावर दोन्ही गाणी म्युझिक व्हिडिओशिवाय रिलीज केली आहेत. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियो द्वारा निर्मित 'लाल सिंह चड्ढा'मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...
Web Title: Phir Na Aisi Raat Aayegi Song Laal Singh Chaddha Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..