मोठी बातमी! सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात दोन अभिनेत्यांसह अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला जाणार..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदवले असून  बॉलीवूडमधील दोन अभिनेत्यांसह एका अभिनेत्रीला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठविली आहे.

मुंबई: सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदवले असून  बॉलीवूडमधील दोन अभिनेत्यांसह एका अभिनेत्रीला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठविली आहे. तसेच पोलिसांना सुशांतच्या मोबाईलच्या सहाय्याने याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

तर दुसरीकडे बॉलीवूडमधील एका बड्या कंपनीसोबत अभिनेता सुशांतसिंगचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्या कंपनीला आता पोलिसांनी या कॉन्ट्रॅक्टची प्रत सादर करण्यास सांगितली आहे. सुशांतच्याआत्महत्येला गटबाजी कारण असल्याचा आरोप नुकताच अनेक कलाकारांनी केला होता. त्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे पाऊल म्हणता येईल. 

हेही वाचा: धक्कादायक! मुंबईत तब्बल 'इतके' डॉक्टर आणि नर्स कोरोना पॉझिटिव्ह; आकडा बघून तुम्हालाही बसेल धक्का.. 

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी रिया चक्रवर्तीसोबत पब्लिक रिलेशन मॅनेजर आणि सुशांतचा व्यावसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला. या दोघांच्याही जबाबात काही विशेष माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रियाकडून सुशांतबद्दल सविस्तर माहिती घेण्य्ाात आली आहे. पोलिसांनी सुशांतचे वडील आणि दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 16 जणांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच डाय-याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात दिवसागणिक नवी माहिती समोर येत आहे. या आत्महत्येप्रकरणी आता बाॅलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी नोटीस पाठविली आहे.  हे दोन्ही स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या करिअरशी संबंधित असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा: सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव खरंच कमी होणार? जाणून घ्या काय म्हणतायत खगोल अभ्यासक..

त्याचप्रमाणे, बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच 3 प्रॉडक्शन प्रमुखांची देखील चौकशी होणार आहे. बॉलिवूडमधील काही बॅक स्टेज कलाकारही चौकशी यादीत आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध् चेहरे समोर येऊन बोलू लागले आहेत.

अशातच सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे.

police will take statements of two actors and one actress in sushant singh case 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police will take statements of two actors and one actress in sushant singh case