धक्कादायक! मुंबईत तब्बल 'इतके' डॉक्टर आणि नर्स कोरोना पॉझिटिव्ह; आकडा बघून तुम्हालाही बसेल धक्का.. 

nurses
nurses

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातील मागील काही महिन्यांच्या काळात शहरातील आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील 1000 हून अधिक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर अनेकांना क्वारंटाईन कारावे लागले. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे दिसत आहे.       
            
कोरोना संसर्गाचा कहर वाढत असून अनेक रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही त्याने आपल्या कवेत घेतले आहे. गेल्या एक आठवड्यात, प्रमुख सार्वजनिक रुग्णालयांचे काही प्रमुख अधिकारी आणि डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर अनेक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना उपचारात आघाडीवर असलेल्या सेव्हन-हिल्स रुग्णालयात मागील दोन दिवसांपूर्वी अधिष्ठात्यांशी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.  

सायन हॉस्पिटलमधील एक ज्येष्ठ व्यवस्थापकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामध्ये पालिकेच्या मुख्य रुग्णालयापैकी असलेल्या सायन आणि केईएम रूग्णालयांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परळच्या केईएम रूग्णालयातील 300 आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 109 सध्या उपचार घेत आहेत आणि 77 कॉरंटाईन आहेत. संक्रमित असलेल्यांपैकी 21 डॉक्टर आणि 18 परिचारिका आहेत. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

रूग्णालयांतील नर्स आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी वॉर्डमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने नर्स तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात काही चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. सायन रुग्णालयात डेप्युटी डीन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 3 महिन्यांत 300 पेक्षा जास्त जण कोरोना संक्रमित झाले आहेत. यांच्यात 100 डॉक्टर आणि जवळपास 70 परिचारिका आहेत आणि उर्वरित वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचारी आहेत. येथे एका शवागृहातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या मृत्यू देखील झाला आहे. शिवाय सायन हॉस्पिटलमधीलच  80 निवासी डॉक्टर आणि इंटर्नर्स पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे डिन डॉ रमेश भारमल यांनी दिली.

एप्रिलपासून सज्ज झालेल्या नायर रुग्णालयात 50 पेक्षा कमी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चांगल्या पीपीई उपलब्ध झाल्याने संक्रमण कमी झाले असल्याचे नायर रुग्णालयाचे डॉ मोहन जोशी म्हणाले. खासगी रुग्णालयांनाही कोविडचा फटका बसला आहे. 

सरकारी रुग्णालयांंशिवाय मोठ्या खासगी रुग्णालयांंही कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. मुंबईत आतापर्यंत सहा डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध मोठ्या रुग्णालयातील 300 पेक्षा अधिक डॉक्टर,नर्स आणि कर्मचारी वर्ग हा बाधित झाला आहे. 200 पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करावे लागले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ पार्थिव संघवी यांनी दिली. 

अनेक कर्मचारी गर्दीच्या ठिकाणांहून येतात. त्यांंच्यामुळे इमर्जन्सी वॉर्डातील डॉक्टरांना कोरोनाचा जास्त धोका  संभावू शकतो. खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य पीपीई किट देऊन योग्य खबरदारी घेण्यास सांगण्यात आले असून सरकारने ही खासगी डॉक्टर आणि रुग्णालये यांनी पीपीई किट पुरवण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

1000 plus doctors and nurses corona positive in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com