Alaya F Video: 'बाई तू आधी...'! वाहतुकीच्या नियमांवर ज्ञान देणाऱ्या अभिनेत्रीचे नेटकऱ्यांनी वाजवले कान

Alaya Furniturewala Video
Alaya Furniturewala VideoEsakal

पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला हिचे नाव बॉलिवूडमधील उभरती अभिनेत्री बनली आहे. ती काही काळापुर्वी कार्तिक आर्यनसोबत फ्रेडी या चित्रपटात दिसली. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. तिच्या अभिनयाचं कौतुकही करण्यात आलं.

alaya furniturewala
alaya furniturewala

मात्र अलाया ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र ती आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

Alaya Furniturewala Video
Salman Khan: भाईजानसाठी पब्लिक खुळी! किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला..

सध्या ती लोकांना वाहतुकीचे नियम शिकवतांना दिसत आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्याचा क्लास घेताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Alaya Furniturewala Video
Shefali shah: 'चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्..', अभिनेत्रीने सांगितला 'तो' भयानक किस्सा

व्हिडिओमध्ये अलाया कारमध्ये बसलेली आहे आणि अचानक तिची नजर चुकीचा यू-टर्न घेणाऱ्या दुचाकीस्वारांवर पडते. हे पाहून आलिया अचानक चिडते. ती त्या लोकांबद्दल म्हणते की, निष्काळजीपणाचीही काही मर्यादा असते.

Alaya Furniturewala Video
Viral Video : नोरा आली, सुरक्षारक्षकांची नजर हटेना! 'घरी बायकोनं जर...'

अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. अशा लोकांना ना ड्रायव्हिंग सेन्स ना ट्रॅफिकिंग सेन्स आहे. त्यांना अक्कलही नाही. अशा लोकांमुळे रोज अनेक लोकांचे अपघात होतात. थोडक्यात तिनं वाहतुकिचे नियम पाळा आणि अपघात टाळा असं सांगितलं. तिला वाटलं ती लोकांना जागृत करत आहे आणि ते तिने केलंही मात्र यावेळी तिने एक चुक केली आणि नेटकऱ्यांनी तिचीच शाळा भरवली.

Alaya Furniturewala Video
Suhana Khan on Rinku Singh: मालकीणबाई खूश झाली, रिंकूला म्हणाली तू तर...

आलयाच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. काही चाहते आलियालाच स्वतः ट्रॅफिक नियम पाळण्याचा सल्ला देत आहेत. आलायाने स्वतः सीट बेल्ट लावला नाही. त्यामुळे चाहते तिच्यावरच बरसले आहेत. 'तु आधी सीट बेल्ट लावं आणि नंतर बाकीच्यांना शिकवं' अशी टिकाही तिच्या व्हिडिओवर कमेंट करत दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com