Shefali shah: 'चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्..', अभिनेत्रीने सांगितला 'तो' भयानक किस्सा

shefali shah
shefali shahEsakal

अभिनेत्री शेफाली शाह ही इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेने एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेफाली शाह ही लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. शेफाली ही कोणत्याही भुमिकेत सहज बसते.

अलीकडेच या अभिनेत्रीने गर्दीच्या ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं उघड झाले आहे. शेफाली अलीकडेच एका पॉडकास्टचा भाग बनली आहे. यादरम्यान, तिने बाजारात गर्दीच्या ठिकाणी मध्यभागी तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाची कहाणी शेअर केली.

shefali shah
Salman Khan: भाईजानसाठी पब्लिक खुळी! किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला..

ANI पॉडकास्ट दरम्यान, शेफाली मीरा नायरच्या 'मान्सून वेडिंग'बद्दल बोलली. या चित्रपटात तिने बालपणी लैंगिक शोषण झालेल्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने लहानपणी लैंगिक शोषण झालेल्या रिया वर्माची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत.

shefali shah
Kamakhya Devi: शिंदे गटापाठोपाठ आता बॉलीवूडमध्ये कामाख्या देवीची क्रेझ, प्रीती पोहचली गुवाहाटीला

दरम्यान, शेफाली शाहने खुलासा केला की प्रत्येकजण यातून गेलं आहे. तिला आठवतं की बाजारात गर्दीत फिरत असतांना तिला चुकीच्या पद्धतिने स्पर्श केलं गेल होत. हे तिला खुपच फालतू वाटलं. याबद्दल ती बोलली की, 'मी कधीही काहीही बोलले नाही कारण मी म्हणणार नाही की ही चूक होती पण ती फक्त... लाजिरवान आहे.'

जेव्हा तिला विचारण्यात आलं की तु या साठी नंतर काही केले का? तेव्हा तिने उत्तर दिले की, होय. मी याच्याशी सहमत आहे. अनेकांना वाटतं, मी काही केलं का? तुम्हाला अपराधी वाटतं, तुम्हाला लाज वाटते आणि तुम्ही ते विसरता. हे आपण आपल्यापर्यंतच ठेवतो. खरं सांगायचं तर, आवश्यक संभाषण होण्यासाठी मी याबद्दल पुरेसा विचार केला आहे असं मला वाटत नाही. हे असे काहीतरी होते जे थेट माझ्या आणि संपूर्ण चित्रपटात गेले.

shefali shah
Kangana Ranaut: अन् शेवटी कंगनालाही तिच्या स्वप्नाचा राजकुमार भेटलाच? फोटो शेअर करत म्हणाली,

शेफाली यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर तिने 'रंगीला', 'सत्या', 'मान्सून वेडिंग', 'वक्त', 'गांधी, माय फादर' आणि 'दिल धडकने दो' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी तिने 'जलसा', 'डार्लिंग्स' आणि 'डॉक्टर जी' मध्ये तीन उत्कृष्ट अभिनय सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com