esakal | 'होय, मी जगाची पर्वा न करता 'ड्रिंक' करायचे, पूजाची कबूली
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh bhatt and pooja bhatt

'होय, मी जगाची पर्वा न करता 'ड्रिंक' करायचे, पूजाची कबूली

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटकेपणासाठी प्रसिध्द असणारी अभिनेत्री म्हणून पूजा भट्टच्या (pooja bhatt) नावाचा उल्लेख करावा लागेल. तिचा बॉलीवूडमधील प्रवासही मोठा राहिली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती बॉम्बे बेगम्स (bombay begums) नावाच्या एका वेबसिरीज (web serise) मध्ये दिसली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा पाठींबा मिळाला होता त्यातील काही दृश्यांवर न्यायालयानं आक्षेपही घेतला होता. बोल्ड (bold) आणि हॉट (hot) विषयांवर आधारलेल्या या मालिकेनं स्त्री वादाची मांडणी केली होती. त्यात पूजाच्या अभिनयानं चाहत्यांची वाहवा मिळवली.(pooja bhatt speaks on dealing with alcoholism on 30 years of dil hai ke manta nahin yst88)

पूजा सध्या चर्चेत आली आहे ते तिच्या दारु पिण्याच्या एका वक्तव्यावरुन. तिनं सांगितलं आहे की, महिलांनी याबाबत अधिक मोकळ्या मनानं विचार करण्याचा विचार करणं गरजेचं आहे. पूजानं सांगितलं, आपण दारु सोडून दिली होती. तसा निर्णयही घेतला होता. आणि हा निर्णय घेताना आपण कुणालाही घाबरलो नाही. कुणाची पर्वाही केली नाही. 1989 मध्ये पूजाचा डॅडी नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये अल्कोहॉलिझमचा मुद्दा हाताळण्यात आला होता.

त्या चित्रपटामध्ये असे दाखविण्यात आले होते की, एक मुलगी आपल्या वडिलांना दारुच्या आहारी जाण्यापासून वाचवते. अनुपम खेर हे त्या चित्रपटामध्ये पूजाचे वडिल झाले होते. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. फिल्मफेयरशी बातचीत करताना पूजानं सांगितले की, आपण नेहमी काही गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करतो. मी चार वर्षांपूर्वी दारु सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी या विषयावर खुलेपणानं बोलण्याचा मी विचार केला होता.

हेही वाचा: आलिया-रणबीरच्या लग्नाआधीच ठरलं घटस्फोटाचं वर्ष, कुणी केली भविष्यवाणी?

हेही वाचा: अदाकारीपेक्षा 'नेकलेसचाच' नखरा, बेलाची कान्समध्ये 'हवा'

डॅडी सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मी माझे करिअर सुरु केले होते. या चित्रपटामध्ये दारु आणि त्याचे दुष्परिणाम यांची चर्चा करण्यात आले होते. आणि वास्तवात मी या विषयांत गुरफटून गेले होते. आता त्यावर मी काय अधिक बोलणार असा प्रश्न मला पडला होता. जे माझ्या बरोबर झाले ते इतर आणखी कुणाही बरोबर होऊ शकते. महिलांनी याप्रकरणात अधिक जागरुक होणं गरजेचं आहे. असं मला वाटतं. अशी प्रतिक्रिया पूजानं दिली आहे.

loading image