'माझी बायको विश्वासघातकी';पुनम पांडेला सॅम बॉम्बेचं सडेतोड उत्तर Poonam Pandey, Sam Bombay | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poonam Pandey, Sam Bombay

'माझी बायको विश्वासघातकी';पुनम पांडेला सॅम बॉम्बेचं सडेतोड उत्तर

कंगनाच्या(Kangana Ranaut) 'लॉकअप' (Lockup)मध्ये बंदिस्त असलेल्या पूनम पांडेनं(Poonam pandey) काही दिवसांपूर्वीच नवऱा सॅमवर काही खळबळजनक आरोप केले होते. आपला नवरा कसा आपल्याला खूप मारायचा,ब्रेन हॅमेरजही त्यामुळे झाले होते असा दावा तिनं शो च्या माध्यमातून केला होता. इतकंच काय पूनम म्हणाली होती की, तिच्या कुत्र्यासोबत झोपल्यावरही तो संशय घ्यायचा. त्यावर आता तिचा नवरा निर्माता सॅम बॉम्बे यानं स्पष्टिकण दिलं आहे. त्यानं सांगितलं आहे की,'' पूनम हे जरा जास्त रंगवून सांगत आहे,यात तथ्य नाही. आमच्या हनिमूनवर मी पूनमसोबत ती सांगते तसे कुठलेच अत्याचार केले नव्हते''. असा दावा आता सॅम बॉम्बेकडून केला जातोय.

हेही वाचा: शर्टलेस,किसिंग सीन देताना प्रभासने घातल्यात अटी; दिग्दर्शकही हैराण

पूनम आणि सॅमने सप्टेंबर,२०२० मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर सॅम पूनमवर अत्याचार करायचा,तिला खूप मारायचा असा आरोप तिच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर सॅम बॉम्बेला पोलिस कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली होती, पूनमने लावलेल्या आरोपांवर स्पष्टिकरण देताना सॅम म्हणाला, ''केव्हा केव्हा परिस्थिती येते की तुमचा हात उठतो. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण समोरच्यावर अत्याचार करतो. आमच्या दोघांमध्ये जे काही झालं त्याला पू्र्णपणे मला जबाबदार ठरवणं चुकीचं ठरेल. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही''.

हेही वाचा: ड्रीमगर्ल हेमामालिनी सोबत मिथुन यांचा रोमॅंटिक डान्स तुफान व्हायरल

सॅम बॉम्बे म्हणाला की,''आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण तरिही वाद झाल्यावर कुणालाही माघार घ्यायची नव्हती,कदाचित दोघांमध्ये असलेला अहंमपणा याला कारणीभूत असेल.'' तो पुढे म्हणाला,''ती माझी बायको आहे.कदाचित तिनं माझ्यासोबत सात फेरे घेतले ते मनापासून घेतले नसतील,पण मी मनापासून तिला सात वचनं दिली होती. तिला जेव्हा कधी माझ्याकडे यावंसं वाटेल तिनं यावं,माझ्या मनात आजही तिच आहे''. तो पुढे म्हणाला,''माझ्या बायकोत सगळे चांगले गुण, फक्त ती इमानदार नाही. आणि हे मला कधीच कळालंय''. आता पुमन-सॅमच्या या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कोण खरं-कोण खोटं यात मात्र मोठ कन्फ्युजन निर्माण झालं आहे.

Web Title: Poonam Pandeys Husband Sam Bombay Saidmy Wife Is Not

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top