Prajakta Mali: प्राजक्ता माळी मनसेत?

Prajakta Mali
Raj  Thackeray
Prajakta Mali Raj Thackerayesakal

दिवाळीचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. राजकीय आणि कलाक्षेत्रामधील मंडळींही दिवाळीच्या शूभेच्छा देत आहेत.बॉलिवूड मंडळींनी तर दिवाळी पार्टीचं खास आजोजन केलं आहे तर राजकीय क्षेत्रातील मंडळीदेखील मागे नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथील दीपोत्सव तर चर्चेचा विषयच बनला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांची भेट घेतली. त्यातच मराठी चित्रपटसृष्टितील अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील राज ठाकरेंच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नव्या चर्चांना उधान आले आहे.

Prajakta Mali
Raj  Thackeray
Zaira Wasim Birthday: 'या' कारणामुळे सिक्रेट सुपरस्टारने सोडली चित्रपटसृष्टी...

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिवाळीबाबत खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.या फोटोत ती शिवतिर्थांवर गेलेली दिसतेय. तिच्यासोबत अशोक शराफ आणि मराठी चित्रपटसृष्टितील काही अभिनेंत्रीदेखील आहेत. त्याच बरोबर राज ठाकरे,शर्मिला ठाकरे त्यांची सून आणि नातू किआनही आहेत. या फोटोंना कॅप्शन देतांना ती म्हणते, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” शिवाजी पार्क येथील “दीपोत्सवाच्या” निमित्ताने पदरात पडलेले काही खास क्षण दीपोत्सवाच्या आमंत्रणासाठी, अतिशय प्रेमानं केलेल्या पाहूणचारासाठी खूप धन्यवाद. “मा. श्री राजसाहेब ठाकरे” - @raj_shrikant_thackeray @amitthackerayspeaks अतिशय गोड अशा “शर्मिला ताई” आणि @ameyakhopkar … दीपोत्सव बघून इतकी भारावून गेले की फोटो काढायचे विसरले…त्यामुळे नेमके ते फोटोज् नाहीत..असो पण. किआन बरोबर फोटो काढला…(त्याला भेटायचच होतं…)

Prajakta Mali
Raj  Thackeray
Big Boss Marathi 4: तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर?

तिचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहे. तिची राजकीय क्षेत्रातील नेत्यांची घेतलेली भेट हि सहजच नसून त्यामागे तिची काही राजकीय भूमिका आहेत का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यातच एकाने तिला याबद्दल कमेंट करत सांगितले ‘प्राजू मी सांगितले आहे की मला तुम्हाला राजकारणात पाहण्याची इच्छा आहे कृपया मनसेमध्ये सामील व्हा आणि राज साहेबांप्रमाणे मराठी लोकांसाठी आणि मराठी पारंपारिक आणि चित्रपटांच्या भल्यासाठी काम करा आणि चांगल्या मराठी टॅलेंटला पुढे आणा….’

तर एकानं तर तिला कमेंट करत सूचवत,‘स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन आहे. तुमचाही हिंदू धर्मावर विश्वास आहे. मी सुचवेन की नवीन पक्ष सुरू करा. महाराष्ट्राला वेगळ्या राजकीय नेत्याची गरज आहे आणि तुम्ही ते प्राजू आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे’.अशी खोचक प्रतिक्रिया दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com