प्रकाश राज यांनी शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अक्षयची उडवली खिल्ली! तू तर... | prakash raj comment on akshay kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar and prakash raj

Akshay Kumar: प्रकाश राज यांनी शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अक्षयची उडवली खिल्ली! तू तर...

Prakash Raj Trolls Akshay Kumar- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं महेश मांजरेकर यांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील एक फोटो शेयर केला होता. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे.

अक्षयचा तो लूक पाहून आतापर्यत त्यावर वेगवेगळ्या अभिनेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी अक्षयचे कौतूक केले आहे. चाहत्यांनी तर अक्षयवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे उपस्थित होते. अक्षयचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जाहीर होताच त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली होती.

Also Read- सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अक्षयचा कुमारचा तो लूक पाहून आता टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांनाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक जेव्हा अक्षय कुमारचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये अक्षयच्या डोक्यावर असणाऱ्या झुंबरामध्ये लाईट लागल्याचे दिसून आले. त्यावरुन नेटकऱ्यांनी मेकर्सवर संताप व्यक्त केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ हा १६३० ते १६८० असा होता. तर लाईटचा शोध हा १८७९ मध्ये लागला होता. मेकर्स जे दाखवत आहेत त्यात चूक होते आहे. असा आरोप नेटकऱ्यांनी केला होता.

प्रकाश राज यांनी ट्विटर वर स्क्रिन शॉट शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अक्षय कुमार आणि मोदी यांचे एक मीम्स शेयर केले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांना ट्रोल केले आहे. तू आता आमच्या अक्षय वर काही बोलू नकोस, तुम्ही सगळे टॉलीवूडचे अभिनेते बॉलीवूडच्या अभिनेत्यांना ट्रोल करायलाच बसले आहात. प्रकाश राज यांनी शेयर केलेल्या त्या व्टिटमध्ये अक्षयच्या त्या व्हायरल लूकवरुन मोदीजी त्याला तू तर गुटखाखोर...तूला काही चूक कळते की नाही, असा प्रश्न विचारताना दित आहेत.