Prakash Raj च्या 3 वर्ष जुन्या फोटोवरनं सोशल मीडियावर खळबळ.. FIR दाखल होण्याची शक्यता.. काय आहे प्रकरण? Praksh Raj 3 years old photo Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Raj

Prakash Raj च्या 3 वर्ष जुन्या फोटोवरनं सोशल मीडियावर खळबळ.. FIR दाखल होण्याची शक्यता.. काय आहे प्रकरण?

Prakash Raj: ट्वीटरवर सुप्रीम कोर्टाचे एक वकील आहेत..ज्यांचे नाव शशांक शेखर झा असे आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. जे तामिळनाडूच्या पोलिसांना टॅग करत त्यांनी विचारले आहे की तुम्ही प्रकाश राज विरोधात केस दाखल केली का? FIR केली?

सोबत अभिनेत्याचा एक फोटो देखील शेअर केला आहे,ज्यात त्यांनी काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केले आहे. ज्यावर कन्नड भाषे लिहिले आहे की- 'मला हिंदी भाषा येत नाही. चला जा...'

आता यावरनं सोशल मीडियावर पुन्हा वाद सुरु झाला आहे.(Praksh Raj 3 years old photo create rucks on social media users ask police to register fir against him)

याच ट्वीटला रीट्वीट करत प्रकाश राज यांनी इंग्रजी आणि कन्नड भाषेमध्ये लिहिले आहे की-''माझी मुळं ज्या मातीत रुजली आहेत..तिथली माझी मातृभाषा कन्नड आहे. जर तुम्ही त्याचा अपमान कराल..त्याचा मान राखणार नाही..आपल्या भाषेची आमच्यावर जोरजबरदस्ती कराल तर मी याचा विरोधच करणार. तुम्ही मला धमकी देत आहात? हे फक्त विचारतोय तुम्हाला''.

माहितीसाठी इथं सांगतो की प्रकाश राज यांनी हिंदी दिवसच्या निमित्तानं १३ सप्टेंबर,२०२० रोजी या फोटोची पोस्ट शेअर केली होती.

याला शेअर करत लिहिलं होतं की-''मला खूप भाषा येतात..समजतात..मी अनेक भाषांमध्ये काम करू शकतो--पण माझे संस्कार..माझी धारणा..माझी पाळंमुळं..माझी ताकद..माझा गौरव..माझी मातृभाषा कन्नड आहे''.

२०२० मध्ये हिंदी दिवसच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यातील कलाकारांनी हिंदी भाषेची जोरजबरदस्ती करण्याविरोधात आवाजा उठवला होता.

यामध्ये अभिनेता धनंजय,प्रकाश राज आणि वशिष्ठ एन सिम्हा यांचा समावेश होता. या सर्वांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर आपापल्या अंदाजात हिंदी दिवस विरोधात आपली मतं मांडली होती.

याच पोस्टवर पुन्हा एकदा ३ वर्षानंतर केस दाखल करायची मागणी केली जात आहे.