ट्रॅफिकला वैतागलात? हे पहा, भर ट्रॅफीकमध्ये 'प्रसाद-मंजिरी' करतायत डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad oak and manjiri oak

ट्रॅफिकला वैतागलात? हे पहा, भर ट्रॅफीकमध्ये 'प्रसाद-मंजिरी' करतायत डान्स

Entertainment news : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'चंद्रमुखी' (chandramukhi) चित्रपटाचा एक दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शनाचा घेतलेला वसा दिवसेंदिवस पुढे जात आहे. नवनवीन विषय आणि आशय घेऊन तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तोच नव्हे तर त्याची पत्नी मंजिरी ओक (majiri oak) देखील सामाजमाध्यमांवर बरीच सक्रिय असते. ती स्वतः वेशभूषाकार असून तिच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती ती चाहत्यांना देत असते. या लोकप्रिय जोडीने सध्या एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याची चर्चा प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

हेही वाचा: विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...

आपण प्रत्येकजन रोज कामानिमित्त प्रवास करत असतो. या प्रवासात वाहतूककोंडी कुणालाही चुकली नाही. ट्रॅफिक लागलं की आपण डोक्याला हात लावतो. पण तोच डोक्यावरचा हात बाजूला करून भर ट्रॅफिक मध्ये आपण नाचलो तर?.. थोडं गमतीशीर वाटतंय. पण प्रसाद आणि मंजिरीने ट्रॅफिकमध्ये धमाल केली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा: Oscars 2022 : कॉमेडियन्सला सर्वत्रच धोका, ऑस्कर सह रशिया- युक्रेन युद्धावर परेश रावल यांचे भाष्य

सध्या इन्स्टाग्राम रीलचा जमाना आहे. त्यामुळे असा रील व्हिडीओ करण्याचा मोह या दोघांनाही आवरलेला नाही. या रीलला त्यांनी 'ट्रॅफिक मधला टाइमपास..' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत प्रसाद आणि मंजिरी गाडीमध्ये आहेत. त्यांच्या पोस्टवरून ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे समजते. अशावेळी काय करायचा असा सर्वांना प्रश्न पडतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर प्रसाद मंजिरीने दिले आहे.

किशोर कुमार यांचे 'पगली... पगली.. कभी तुमने सोचा...' या लोकप्रिय हिंदी गाण्यावर त्यांनी डान्स करून रील तयार केले आहे. या व्हिडिओवर सध्या कमेंटचा पाऊस पडत आहे. आम्हालाही असा टाईमपास करायला नक्की आवडेल असे चाहत्यांनी म्हंटले आहे.

Web Title: Prasad Oak And Majiri Oak Dance In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top