सलीम खान यांनाच आवडला नाही सलमानचा 'राधे'; म्हणाले..

'राधे' चित्रपटाला IMDb वरही सर्वांत कमी रेटिंग
सलीम खान यांनाच आवडला नाही सलमानचा 'राधे'; म्हणाले..

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe :Your Most Wanted Bhai हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सलमानचे वडील सलीम खान Salim Khan यांनाच हा चित्रपट आवडला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते सलमानच्या चित्रपटांबद्दल व्यक्त झाले. (Salman Khan film radhe gets negative review from dad Salim Khan)

प्रभूदेवा दिग्दर्शित 'राधे' या चित्रपटाला IMDb वरही 1.7/10 इतकी रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटाविषयी सलीम खान 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "राधेच्या आधी प्रदर्शित झालेला दबंग ३ हा पूर्णपणे वेगळा चित्रपट होता. राधे हा काही खूप चांगला चित्रपट आहे अशातला भाग नाही. पण व्यावसायिक चित्रपटांवर त्यात काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पैसे देण्याची जबाबदारी असते. कलाकारांपासून निर्माते, वितरक, प्रदर्शक अशा प्रत्येकांना पैसा मिळणं महत्त्वाचं असतं. अशामुळे चित्रपटाचा व्यवसाय चांगला चालतो. याचा विचार केला तर सलमानने चांगलं काम केलं. कारण चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचा पैसा मिळाला. पण त्याव्यतिरिक्त विचार केला तर राधे हा काही खास चित्रपट नाही."

सलीम खान यांनाच आवडला नाही सलमानचा 'राधे'; म्हणाले..
Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी

सध्या चित्रपटसृष्टीत चांगले पटकथालेखक नसल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. "सध्या फिल्म इंडस्ट्रीची सर्वांत मोठी समस्या म्हणजे इथे चांगले पटकथालेखक नाहीत. यामागचं कारण म्हणजे आताचे लेखक हे हिंदी किंवा उर्दूमधील साहित्य वाचत नाहीत. जंजीर हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतला सर्वांत महत्त्वाचा चित्रपट होता. त्या चित्रपटामुळे भारतीय सिनेमा योग्य मार्गावर आला होता. पण त्यानंतर सलीम-जावेद यांची जागा कोणीच घेतली नाही. अशा परिस्थितीत, सलमान तरी काय करणार", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com