Prithviraj Song OUT: आदर्श शिंदेच्या आवाजात ‘हरि हर’!, नेटकरी भारावले |Prithviraj Movie first song hari har by Adarsh Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Movie first song hari har song

Prithviraj Song OUT: आदर्श शिंदेच्या आवाजात ‘हरि हर’!, नेटकरी भारावले

Bollywood Movie: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या पृथ्वीराज या चित्रपटासाठी चर्चेत आला आहे. तीन वर्षांपासून पृथ्वीराजची कोणत्या (Bollywood News) ना कोणत्या निमित्तानं चर्चा होत आहे. काहा दिवसांपूर्वी त्याच्या नावावरुन तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजपुत संघनेनं (Prithviraj Movie) त्यावरुन अक्षयला धारेवर धरले होते. या चित्रपटाचे नाव बदलावं म्हणून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पृथ्वीराजचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

पृथ्वीराजमधील ‘हरि हर’ नावाचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अवघ्या काही तासांत या गाण्याला लाखो व्हयुज मिळाले आहेत. भारतीय इतिहासात मोठं योगदान पृथ्वीराज चौहान यांचे आहे. परदेशी टोळ्यांना चांगलाच धडा शिकवणाऱ्या चौहान यांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून पुढे येणार आहे. ट्रेलरमध्ये देखील पृथ्वीराज यांच्या शौर्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. पृथ्वीराजमध्ये अक्षय सोबत संजय दत्त, सोनु सुद, मानुषी छिल्लर, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेकर्सच्यावतीनं आता पहिलं गाणं व्हायरल झालं असून ते गाणं अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

प्रख्यात मराठी गायक आदर्श शिंदे याच्या आवाजातील हरि हर ऐकून व्हाल थक्क अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या व्हायरल झाल्या आहेत. संगीत शंकर एहसान लॉय यांचं असून गीतलेखन वरुण ग्रोव्हरनं केलं आहे. आदर्श शिंदेशिवाय आणखी काही जणांचा आवाज या गाण्याला आहे. अक्षयनं देखील सोशल मीडियावरुन गाणं शेयर केलं आहे. अक्षयचा हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून तो तीन जुनला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा: Prithviraj : 'उत्तराधिकारी रिश्ते से नही योग्यतासे चुना जाता है', अंगावर काटा आणणारा ट्रेलर

Web Title: Prithviraj Movie First Song Hari Har By Adarsh Shinde Akshay Kumar Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top