
Prithviraj : 'उत्तराधिकारी रिश्ते से नही योग्यतासे चुना जाता है', अंगावर काटा आणणारा ट्रेलर
Prithviraj Trailer: बहुचर्चित आणि प्रतिक्षित अशा पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर अखेर (Bollywood Movie) प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्याबाबत वाद सुरु होता. त्या चित्रपटाचे नाव बदलावी अशी मागणी राजस्थानमधील काही संघटनांनी केली होती. त्यामुळे अक्षयच्या समोर मोठी (Akshay Kumar) डोकेदुखी होती. पृथ्वीराजच्या ट्रेलरमधून त्या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ट्रेलर तर प्रेक्षकांना प्रचंड भावला असून त्याला वेगवेगळ्या कमेंटस प्रेक्षकांनी (Bollywood Actor) दिल्या आहेत.साधारण तीन ते चार वर्षांपासून अक्षयचा हा महत्वकांक्षी प्रोजेक्ट कोविडमुळे रखडला होता. त्यामुळे त्याचे चित्रिकरणही पुढे ढकलण्यात आले होते. (Bollywood Actress) काल त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर आल्यानंतर अक्षयच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पृथ्वीराजचा ट्रेलर व्हाय़रल केला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ऐकु येणाऱ्या संवादानं पृथ्वीराज काय आहे याची कल्पना येते. त्याचा तो भव्य सेट, संगीत, छायाचित्रण हे सारं प्रेक्षकांच्या नजरेत भरणारं आहे. सम्राट पृथ्वीराजची यशोगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, पृथ्वीराज यांचे नाव आदरानं न घेतल्याचा आरोप निर्माते आणि अभिनेता अक्षय कुमारवर करण्यात आला आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश व्दिवेदी यांचे दिग्दर्शन असलेल्या पृथ्वीराज चित्रपटाची रिलिज डेट 3 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा: #Prithviraj : ही 'मिस वर्ल्ड' साकारणार 'राणी संयोगिता'ची भूमिका!
साधारण 1191 आणि 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मुहमद घुरी यांच्यात झालेल्या युद्धाचं चित्रणही ट्रेलरमध्ये आहे. युद्धाचे जे प्रसंग ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे ते प्रभावी आहेत. केवळ युद्धच नाहीतर पृथ्वीराज चौहान आणि राजकुमारी संयोगिता यांची प्रेमकथाही यानिमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षयसोबतच प्रसिद्ध अभिनेता सोनु सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, यांचाही दमदार परफॉर्मन्स लक्ष वेधून घेणारा आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वास्तविक दोन वर्षांपूर्वीच दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसल्यानं त्याचे प्रदर्शन सतत लांबणीवर पडले होते.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
Web Title: Akshay Kumar Prithviraj Movie Trailer Viral Former Miss World Manushi Chiller Lead Actress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..