प्रिया बापटच्या फिटनेसचं रहस्य कॉफी;तासाला चक्क इतके कप पिते

सोशल मीडियावर व्हिडीओ रील पोस्ट करून सांगितली त्यामागची कहाणी
Priya Bapat
Priya BapatGoogle

प्रिया बापट(Priya Bapat) म्हणजे गोड दिसणारी अन् फिटनेसला महत्त्व देणारी एक गुणी अभिनेत्री. तिनं आजपर्यंत तिच्या कारकिर्दीत केलेल्या मालिका,सिनेमा अन् नाटकांमधनं आपल्या अभिनयाची छाप सर्वसामान्य प्रेक्षकांवर पाडली आहे. तिनं सुरुवातीला काही हिंदी सिनेमांमधूनही छोट्या भूमिका केल्या होत्या. पण त्याही भूमिका तिच्या लक्षवेधी ठरल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता बघा नं,संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' सिनेमात मेडिकल स्टुडंट आणि संजयच्या फ्रेंड सर्कलमधील एक म्हणून ती दिसली होती,पण सिनेमात वर्गात तिचा प्रश्न विचारतानाचा तो सीन आजही लख्ख डोळ्यासमोर आठवलं की उभा राहतो. उमेशसोबत लग्नाला दहा वर्ष होऊन गेली असली तरी तिचं त्याच्यासोबतचं नातं वर्षागणिक अधिक बहरत गेलेलं दिसून आलंय. त्या दोघांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ रील्सना किंवा पोस्टना पसंत करणारे युजर्स लाखो आहेत. त्या दोघांची केवळ ऑफ स्क्रीन नवरा बायको म्हणूनच नाही तर सहकलाकार म्हणून ऑनस्क्रीन केमिस्ट्री तितकीच उत्तम आहे हे त्यांनी एकत्र केलेल्या सिनेमा,वेबसिरीजमुळे आपल्याला माहितच असेल.

प्रियाच्या सिनेमांइतकेच तिच्या फिटनेसचे चाहतेही अनेक आहेत. ती खूप हार्ड एक्सरसाइज करते त्यामुळे एक्सरसाइज करताना आपण तिच्यापासून दोन हात लांब राहतो असं अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या मुलाखतीतून सांगितलं आहे. खरंतर प्रिया नेहमीच एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. पण केवळ एक्सरसाइजच नाही तर तिच्या फिटनेसचं आता एक नव रहस्य समोर आलंय जे स्वतः प्रियाने सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ रीलच्या माध्यमातून शेअर केलंय. त्या व्हिडीओत प्रिया कॉफी पिताना दिसत आहे.

Priya Bapat
'जय भीम' सिनेमाची ऑस्कर झेप;जगभरात 'सूर्या' चा बोलबाला

बॅकग्राऊंडला एक आवाज ऐकायला येतोय,ज्यात विचारलं जातंय की दिवसातून तुम्ही दुपारी १ ते ३ या वेळात किती कप कॉफी पिता?त्यावर उत्तरादाखल आवाज येतो ,''८ कप,हो पण १ ते३ या वेळेत नाही तर दुपारी १२ ते १ या वेळेत''. आणि आपणही ८ कप कॉफी केवळ एका तासात पितो असं प्रियाने कबूल केलंय, सर्व कॉफी लवर्सना तिनं ही व्हिडीओ रील समर्पित केली आहे. आणि सगळ्यांचे त्यावर कमेंट्सही मागवले आहेत. आता कॉफी पिऊन प्रियासारखं इतकं फीट राहता येत असेल तर कोण तिच्या पावलावर पाऊल ठेवणार नाही. म्हणजे काही खाण्यातून वर्ज्य नाही करायचं तर त्याचं अॅडिक्शन लावायचं हा ग्रेटच उपाय आहे नाही का.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com