प्रियदर्शन जाधव आता खेळतोय नवी इनिंग; पण कोणती? घ्या जाणून...

priyadarshan jadhav
priyadarshan jadhav

मुंबई ः मराठी चित्रपटसृष्टीत टाईमपास 2, हलाल, चोरीचा मामला अशा अनेक चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम करणारा अभिनेता प्रियदर्शन जाधव आता वेगळी इनिंग खेळत आहे. चित्रपट तसेच नाटकांतून विविध भूमिका त्याने साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुकही केले आहे. मात्र आता तो वेबविश्वात पदार्पण करीत आहे. 

'भुताटलेला' या वेबसीरीजमध्ये प्रियदर्शन काम करीत आहे. ही पाच भागांची वेबसीरीज आहे आणि ती मराठीबरोबरच हिंदीमध्येही येणार आहे. एमएक्स प्लेअरवर ती निःशुल्क पाहायला मिळणार आहे.. शिवाजी लोटन पाटील या हरहुन्नरी  दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली ही वेबसीरिज आहे. शिवाजी लोटन पाटीलने मराठीमध्ये वावटळ, धग, हलाल, भोंगा असे काही दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये दिग्दर्शित केले आहेत आणि त्याच्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांसहित अनेक पुरस्कार मिळविलेले आहेत. एक कल्पक आणि हुशार दिग्दर्शक म्हणून तो ओळखला जातो. 

रायबा आणि शिवानी यांच्या लग्नाच्या आधी घडलेल्या घटनेवर आधारित ही वेबसीरीज आहे. प्रियदर्शन जाधव या वेबसीरिजमध्ये रायबाच्या भूमिकेत तर शिवानीच्या भूमिकेत सुरभी हांडे दिसणार आहे. रायबाच्या हळदीच्या दिवशी तो भुता-प्रेतांना दूर ठेवण्यासाठी आईने दिलेली कट्यार विसरतो त्याच वेळी त्याला जाणवतं की कोणी तरी अज्ञात त्याचा पाठलाग करतंय. मग ते कोण असतं की रायबाच्या मनात संशयाचं भुत असतं. हे वेबसीरीज पाहिल्यावर समजणार आहे. प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे यांच्या सोबतच योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील हेसुद्धा कलाकार या वेबसीरिजमध्ये आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रायबासोबत नंतर काय काय होणार याच रहस्य यातील पाच भागांमध्ये हळूहळू उलगडणार आहे. हॉरर आणि कॉमेडी यांचे मिश्रण यामध्ये पाहायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com