'येरे येरे पावसा' चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव; 'हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020'मध्येही पुरस्कार

ye re ye re pawsa
ye re ye re pawsa

मुंबई ः सध्या लाॅकडाऊन आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. मात्र ऑनलाईन चित्रपट पुरस्कार सोहळे तसेच टीव्ही आणि चित्रपट महोत्सव पार पडत आहेत.आता नुकताच हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020 (HNFA)या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाईन पार पडला आहे. या महोत्सवात 'येरे येरे पावसा' या मराठी चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पावसात सगळे जण सुखावले असताना या आनंदात  'येरे येरे पावसा'ची संपूर्ण टीम न्हाऊन निघाली आहे.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम. कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020 (HNFA) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, सहाय्यक अभिनेता, संकलन आणि साऊंड डिझायनिंग या विभागासाठी या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत. 'हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020' या आंतरराष्ट्रीय महोत्सवात 13 नामांकने मिळवलेल्या या चित्रपटाने तब्बल सहा पुरस्कार पटकावित बाजी मारली आहे.

'येरे येरे पावसा' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका शफक खान यांनी या पुरस्कारांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पावसाची धमाल आणि लहानग्यांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. पावसाचं आगमन जसं प्रत्येकाला सुखावणारं असतं तसा हा चित्रपटही प्रत्येकाच्या मनाला एक वेगळी उभारी देणारा असेल असा विश्वास वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com