Priyanka Chopra : प्रियांकाने सांगितला शस्त्रक्रियेनंतरचा भयानक अनुभव; म्हणाली...

स्वतःचा चेहरा बघितल्यावर ओळखू शकत नव्हती
Priyanka Chopra Latest News
Priyanka Chopra Latest NewsPriyanka Chopra Latest News
Updated on

Priyanka Chopra Latest News आपण सुंदर दिसाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग ती सामान्य स्त्री असो किंवा अभिनेत्री. सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. अभिनेत्री तर शस्त्रक्रियाही करतात. शरीरातील एक विशिष्ट भाग चांगला दिसावा यासाठी शस्त्रक्रिया (Surgery) केली जाते. यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचाही समावेश आहे. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केलेल्या अभिनेत्रींपैकी प्रियांका एक आहे.

प्रियांका चोप्राचे ‘अनफिनिश्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. मित्राच्या सांगण्यावरून डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया (Surgery) करताना डॉक्टरांनी नाकातील पॉलिप काढताना ब्रिजलाही धक्का लावला. त्यामुळे नाकाचा आकार पूर्णपणे बिघडला होता, असे पुस्तका प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणाली.

Priyanka Chopra Latest News
Gauri Khan : गौरीने सुहानाला दिला डेटिंगवर सल्ला; एकाच वेळी दोन मुलांना...

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी नाकावरील पट्टी काढली तेव्हा माझा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसत होता. प्रत्येकवेळी स्वतःला आरशात बघितल्यावर चेहरा ओळखू शकत नव्हती. याचा व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम झाला. आधीची शस्त्रक्रिया बिघडल्यानंतर मला नाक ठीक करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली, असेही प्रियांकाने सांगितले.

का केली शस्त्रक्रिया?

प्रियांका चोप्राने नाकाची शस्त्रक्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे तर दम्यामुळे केली होती. मात्र, याचा तिला अधिकचा त्रास सहन करावा लागला. तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता. अभिनेत्री सैंदर्य वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेचा आधार घेतात हे मात्र तितकेच सत्य...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com