प्रियांकाने 'जोनास' आडनाव हटवलं; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस | Priyanka Chopra Nick Jonas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Memes on Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियांकाने 'जोनास' आडनाव हटवलं; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा Priyanka Chopra हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून जोनास हे आडनाव काढून टाकलं. यावरून सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास Nick Jonas घटस्फोट घेणार आहेत की काय, अशाही चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत.

प्रियांकाने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील नावात प्रियांका चोप्रा जोनास असा बदल केला होता. आता तिने चोप्रा जोनास ही दोन्ही आडनावं काढून फक्त प्रियांका असं ठेवलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही बिनसलंय का, अशा चर्चा होत आहेत.

हेही वाचा: प्रियांकाच्या 'या' निर्णयामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; आई मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया

चर्चांवर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांचं स्पष्टीकरण

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा यांनी प्रियांकाच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अशा अफवा पसरवू नका अशीही विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली. प्रियांकाची मुंबईमधील खास मैत्रिणीनेही यावर प्रतिक्रिया दिली. इ टाइम्सला दिलेला मुलाखतीत ती म्हणाली, अशा अर्थहीन चर्चांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर जे फॉलोवर्स असतात त्यांना अती विचार करायची सवय असते असंही ती म्हणाली.

निक आणि प्रियांकाने नुकतंच नवीन घर घेतलं असून या घरात दोघं राहायला गेले आहेत. घराचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या नव्या घरातच प्रियांका आणि निकने दिवाळी साजरी केली होती. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका निक सोबत अमेरिकेत राहायला गेली.

loading image
go to top