प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी घेते तब्बल इतके पैसे

स्वाती वेमूल
Tuesday, 23 February 2021

आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! 

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची फॅन फॉलोईंग संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर प्रियांका हॉलिवूडकडे वळली आणि तिथेसुद्धा ती यशस्वी ठरली. डिसेंबर २०१८ मध्ये तिने अमेरिकी गायक निक जोनासशी लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्येच ती शिफ्ट झाली. प्रियांका तेव्हापासून अमेरिकेतच राहत आहे. मात्र यामुळे ती बॉलिवूड किंवा इथल्या चाहत्यांपासून दूर झालेली नाही. 

सोशल मीडियावर प्रियांकाची क्रेझ असून तिच्या प्रत्येक फोटो, व्हिडीओला लाखोंमध्ये लाइक्स व कमेंट्स मिळतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाहिरातींसाठी किंवा प्रमोशन्ससाठी ती भरभक्कम रक्कम घेते. सोशल मीडियावर प्रियांकाची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे ६०.७ दशलक्ष फॉलोअर्स असून एका पोस्टच्या प्रमोशनसाठी ती दोन कोटी रुपयांच्या आसपास मानधन घेते. २०१९ या वर्षात प्रियांकाने २३.४ कोटी रुपये कमावले. ही कमाई चित्रपट, जाहिराती व प्रमोशनच्या माध्यमातून झाली. 

हेही वाचा : करीनाच्या मुलाचा पहिला फोटो आला समोर; तुम्ही पाहिलात का? 
 

ऑक्टोबर २०१९ मध्ये 'द स्काय इज पिंक' हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. मात्र यातील प्रियांका व झायरा वसीमच्या अभिनयाचं फार कौतुक झालं. या चित्रपटाने जवळपास वीस कोटी रुपये कमावले होते. 

हेही वाचा : दहा वर्षात एक 'सैराट' बनून काय उपयोग? गश्मीर महाजनीची रोखठोक भूमिका

एका रिपोर्टनुसार, प्रियांकाने अॅमेझॉन प्राइमसोबत दोन वर्षांचा मल्टिमिलियन डॉलरचा करार केला आहे, या कराराला मल्टिमिलियन डॉलर फर्स्ट लूक टेलिव्हिजन डील असं नाव देण्यात आलं आहे. प्रियांकाने हा करार स्वीकारला असून याअंतर्गत ती जागतिक स्तरावर टेलिव्हिजन विश्वात कंटेट आणणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra fee for social media promotional post and her income details