निकसोबत आठ दिवस बंद खोलीत असलेली प्रियांका आली लाईव्ह

priyanka chopra has been at home with her husband for 8 day
priyanka chopra has been at home with her husband for 8 day
Updated on

कोरोना व्हायरसचा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय..सगळीकडेच या व्हायरसने थैमान घातलंय..त्यातंच देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीये..त्यामुळे सरकारने गर्दी टाळण्यासाठी अनेक राज्यातील चित्रपटगृह आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.. तर दुसरीकडे बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अनेक सिनेमांचं शूटींग रद्द करण्यास सांगितली आहे तर काही सिनेमांचं प्रदर्शन  देखील थांबवण्यात आलंय..आणि याचमुळे बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मिडीयावर सारखे ऍक्टीव्ह होताना दिसून येतायेत आणि सोबतंच कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक सल्ले देत आहेत...

यातंच आता अभिनेत्री प्रियंका चोप्राने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येऊन लोकांसोबत चर्चा केली. यात तीने पती निक जोनाससोबत ८ दिवस घरात बंद असल्याचं सांगितलं आणि जाता जाता एक नवीन घोषणा केलीये..

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन सांगितलं की, मी अशी आशा करते की तुम्ही सगळे सुरक्षित असाल..मी इथे तुम्हा सगळ्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आली आहे..हा एक असा काळ आहे ज्याने आपल्या सगळ्यांच आयुष्य बदलून टाकलंय. आम्ही एवढे व्यस्त असायचो आणि आता अशी हालत आहे की गेल्या ८ दिवसांपासून आम्ही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहोत..यामुळे खरं तर फारंच विचित्र वाटतंय..कोरोनामुळे इंटरनेटवर ज्या काही बातम्या पसरत आहेत त्यावर प्रियंका म्हणाली जे जे तुम्ही वाचताय ते मी देखील वाचतेय जे खूपंच भयानक आहे..

प्रियंका सांगतेय, कोरोनावर इंटरनेटवर येत असलेल्या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे आणि किती चूकीचं आहे हे समजणं थोडं कठीण आहे..आणि यासाठीच मी माझ्या चाहत्यांसाठी लवकरंच  डॉक्टरांच्या एका टीमसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह येणार आहे जे या कोरोनाबाबत योग्य आणि अचूक माहिती देतील..यासोबतंच कोरोनामुळे लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि शंकांच ते निरसन करतील..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com