प्रियांका चोप्रासोबत अनेक सेलिब्रिटींचा खाजगी डेटा झाला हॅक..

priyanka
priyanka

मुंबई- अमेरिकेमधील एका प्रतिष्ठित मिडिया आणि एंटरटेन्मेंट संस्थेमधून प्रियंका चोप्रा, लेडी गागा, मॅडोना, निकी मिनाज, ब्रुस स्पिंगस्टीन सारख्या अनेत प्रसिद्ध व्यक्तींचा डेटा चोरीला गेला आहे. हॅकर्सने या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित डेटा हॅक केला आहे. वरायटी डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, न्युयॉर्कमध्ये असलेल्या या संस्थेमधून हॅकर्सनी जवळपास ७५६ जीबी डेटा चोरला आहे. ज्यात त्यांचे कॉन्टॅक्ट्स, गुप्त करार,फोन नंबर्स, ईमेल आयडी आणि इतर वैयक्तिक गोष्टींचा समावेश आहे.

या संस्थेला जीएसएमलॉ डॉट कॉम नावाने ओळखलं जातं. इंटरनेटच्या इतिहासातील हा सर्वात सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये इतरही काही महत्वाच्या व्यक्तींची नावं आहे ज्यांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. असं असलं तरी या संस्थेच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती समोर आलेली नाही. आणि सध्या त्यांची वेबसाईट देखील ऑफलाईन असून त्यावर केवळ जीएसएमलॉ डॉट कॉमचा लोगो दिसत आहे.

विशेष म्हणजे या संस्थेच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये डिस्कवरी, ईएमआय म्युझिक ग्रुप, फेसबुक, एचबीओ, आयमॅक्स, एमटीव्ही, एनबीए एंटरटेन्मेंट, प्लेबॉय एंटरप्रायजेस, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक, सोनी क्रॉप, स्पोटीफाय, ट्रिबेका फिल्म फेस्टीवल. युनिवर्सल म्युझिक ग्रुप सारख्या अनेकांचा समावेश आहे. 

सोफोस या जागतिक सायबर सिक्युरिटी संस्थेच्या म्हणण्यानुसार, कायदेशीर संस्थेचे कामकाज तात्पुरते थांबवण्याऐवजी रॅन्समवेअर या खंडणी मागणा-या सॉफ्टवेअरने त्यांच्या सेलिब्रिटी ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरली आहे. सोफोसच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या रॅन्समवेअरच्या सायबर हल्ल्यांमध्ये गुन्हेगार चोरी केलेली माहिती डार्क वेबवर टाकण्याची धमकी देत खंडणीची मागणी करतात. 

याआधीही या सॉफ्टवेअरचा वापर करुन अमेरिकेतील रुग्णालयांवर सायबर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतरचा हा दुसरा मोठा हल्ला आहे.   

priyanka chopra lady gaga and more personal data got hacked phone recording stolen  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com