प्रियंकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच.. Priyanka Chopra New Look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra New Look:

Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

Priyanka Chopra New Look: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हे मनोरंजन सृष्टीतलं खुप लोकप्रिय नाव आहे. प्रियंका कुठेही गेली तरी ती तिथली लाईमलाईट चोरते. सर्वत्र तिची मोहिनी पसरवण्याचं काम ती करत असते. प्रियंका इटलीमध्ये सुरू असलेल्या बल्गेरी इव्हेंटमध्ये दिसली होती.

ग्लोबल आयकॉन आणि ब्रँड अॅम्बेसेडर प्रियांका ने गुरुवारी दुपारी इटलीतील बुल्गारी हॉटेल रोमाच्या उद्घाटनात जबरदस्त एंट्री घेतली आणि तिच्या मनमोहक लूक ने सगळ्यांची मन जिंकली.

जागतिक व्यासपीठावर लक्झरी ब्रँडचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली. बुल्गारीचे सीईओ जीन क्रिस्टोफ बेबिन यांनी आयोजित केलेल्या शानदार लॉन्चमध्ये सहकारी ब्रँड अॅम्बेसेडर आणि प्रियंकाची मैत्रीण झेंडया देखील तिच्या सोबत होती.

प्रियंकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या फॅशनने या खास इव्हेंट मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली. तिच्या लूकच्या अदा अगदीच मनमोहक होत्या. प्रियांकाच्या या ड्रेसच्या चर्चा जगभरात झाल्या.

फोटोंमध्ये, प्रियांकाने पांढरा Giambattista Valli Couture गाऊन घातला आहे. हा गाउन प्लंजिंग व्हि नेकलाइने डिझाइन करण्यात आला होता. गाऊनमध्ये हाय स्लिट आणि फ्लोर-स्वीपिंग ट्रेल कमालिचा दिसत होता. या संपूर्ण लुकबरोबरच प्रियांकाची पिगटेल हेअरस्टाईल ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रियांका चोप्रा-जोनास तिच्या Amazon Prime Videos spy series Citadel मधून जागतिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पहिल्या सीझनचा प्रीमियर 28 एप्रिल झाला आणि जगभरात याच कौतुक देखील झालं.

नादिया सिन्ह तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. ती गेल्या महिन्यात हॉलिवूडच्या रोमँटिक कॉमेडी 'लव्ह अगेनम'ध्येही दिसली.

ती सध्या जॉन सीना आणि इद्रिस एल्बा सह- अभिनीत असलेल्या हेड्स ऑफ स्टेटसाठी तयारी करत आहे.

पुढील वर्षाच्या शेवटी आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'जी ले जरा' या तिच्या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करणार असल्याचं समजतय.