प्रियंका चोप्राच्या लेकीला पाहण्यासाठी १ वर्ष पाहावी लागणार वाट, या दिवशी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra reveals her daughter malti face after one year on malti's first birthday

प्रियंका चोप्राच्या लेकीला पाहण्यासाठी १ वर्ष पाहावी लागणार वाट, या दिवशी..

Priyanka chopra daughter : बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. मध्यंतरी ती सरोगसीच्या मुद्द्यावरून ट्रोल देखील झाली होती. प्रियंका आणि निकला एक मुलगी आहे. जिचे नाव मालती असे आहे. गेली काही दिवस मालतीला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. परंतु त्याला आता एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. (priyanka chopra reveals her daughter malti face after one year on malti's first birthday)

प्रियंका आणि निक बऱ्याचदा आपल्या मुलीसोबतचे फोटो शेयर करत असतात. परंतु त्यात मुलीचा चेहरा दिसत नाही. कधी एकदा मालतीचा चेहरा दिसतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण आता वर्षभर तरी त्यासाठी वाट पहावी लागणार आहे. याबाबत स्वतः प्रियंका चोप्राच्या आईने म्हणजे मधू चोप्रा यांनी माहिती दिली आहे.

प्रियांकानं आपल्या लेकीचं नाव आईच्या नावावरुन ठेवलं आहे. तिच्या आईचं नाव मधुमालती असं आहे. त्यावरुन तिनं लेकीचं नाव 'मालती' असं ठेवलं आहे. मधु चोप्रा सध्या आपल्या नातीची विशेष काळजी घेत आहेत. त्या एका मुलाखतीत म्हणाल्या की 'प्रियंका आणि निक दोघेही आपल्या मुलीची खुपण काळजी घेत आहेत, पण ते इतक्यात तिचा चेहरा दाखवणार नाहीत. कदाचित तिच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही तिला पाहू शकता,' असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आता एक वर्षभर त्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

प्रियांका आणि निक जोनस जानेवारी महिन्यात सरोगसीद्वारे आई वडील झाले. मदर्स डेचं औचित्य साधून प्रियांकानं लेकीची पहिली झलक सोशल मिडियावर शेअर केली. तेव्हा तिनं मालती जन्म झाल्यानंतर 100 दिवस आयसीयूमध्ये असल्याची धक्कादायक बाबही सांगितली. त्यामुळे प्रियंका आणि जोनस दोघेही तिच्या बाबतीत खूपच हळवे आहेत. आम्ही लवकरच तिचा चेहरा दाखवू असे ते म्हणाले होते खरे पण आता त्यासाठी २०२३ च उजाडावं लागेल असं दिसतंय.

Web Title: Priyanka Chopra Reveals Her Daughter Malti Face After One Year On Maltis First Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top