'बाहों में चले आओ'...प्रियांका-निकचे रोमॅंटीक फोटोज झाले व्हायरल|Priyanka-Nick latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra-Nick Jonas

'बाहों में चले आओ'...प्रियांका-निकचे रोमॅंटिक फोटोज झाले व्हायरल

अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिचा नवरा, अभिनेता-गायक निक जोनाससोबत (Nick Jonas) अमेरिकेत एकत्र नवीन वर्ष साजरे करताना अनेक फोटो शेअर केले. प्रियांकाने इंस्टाग्रामवर त्यांच्या NYE सेलिब्रेशनचे (Celebration) फोटो पोस्ट केले. फोटोंमध्ये, या जोडप्याने यॉटवर (Yatch) एकत्र काही रोमँटिक क्षणांचा आनंद लुटला आहे.

प्रियांकाने स्माईल इमोटिकॉनसह 'हेवन' असे जोडले होते. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, “फोटो डंप. मित्र परिवार आणि कुटुंबाचे आभार.”

याआधी, निकनेही नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रियंकासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, “माय फॉरएव्हर न्यू इयर किस” असे कॅप्शन दिले होते.

त्यांच्या शेड्युलमुळे, दोघेही लॉंग डिसटंन्स (Long-distance) लग्न सांभाळत आहेत. अलीकडेच, पि.सी. ने तिच्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवरून 'जोनस' हे नाव वगळल्यावर खळबळ उडाली होती. तिच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, तिने तिच्या चाहत्यांना 'हे फक्त सोशल मीडिया आहे' म्हणून 'जस्ट चिल' करण्यास सांगितले. लोकांसाठी प्रत्येक गोष्ट एवढी मोठी कशी बनते, याबद्दल तिला ‘कमाल’ वाटले.

हेही वाचा: Fact Check : विमानतळावर लघूशंका करणारा तो युवक आर्यन खान नाही

प्रियांका नुकतीच 'द मॅट्रिक्स रिझर्क्शन्स' (The Matrix Resurrections) मध्ये केनू रीव्ससोबत (Keanu Reeves) दिसली होती. संपूर्ण डिसेंबरमध्ये अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. ती पुढे रुसो बंधूंनी (Russo brothers) निर्मित 'सिटाडेल' (Citadel) आणि नंतर फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'जी ले जरा' (Jee Le Jara) मध्ये दिसणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top