प्रियांका चोप्राने चित्रीकरणाला केली पुन्हा सुरुवात; चित्रपटाचे नाव आहे.... 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 जुलै 2020

देसी गर्ल प्रियांकाने यापूर्वी हॉलीवूडमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिचे पुढचे प्रोजेक्ट कोणते असणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती.

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली. संपूर्ण सिनेसृष्टीचं शूटिंग थांबलं आहे. आपल्या देशाप्रमाणे परदेशी सिनेसृष्टीलाही याचा फटका बसत आहे. आता 3-4 महिन्यांनंतर हळू हळू शूटिंगला सुरुवात झाल्याचं चित्र पहायला मिळतंय. बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल दिवा प्रियांका चोप्रा कियानू रीव्हजच्या 'मॅट्रिक्स 4' या सिनेमावर काम करत होती. परंतु लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

कोरोनामुळे मार्च महिन्यात या सिनेमाचं शूटिंग थांबविण्यात आल्यानंतर निर्मात्यांनी बर्लिनमध्ये सुरक्षा नियमांचं पालन करून नुकतेच चित्रीकरण पुन्हा सुरू केले आहे.  या सिनेमाचं लॉकडाउनपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील शूटिंग पूर्ण झालं होतं. प्रादुर्भाव वाढतच गेल्याने प्रोडक्शनने चित्रीकरण तत्काळ थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला . कोरोनाच्यापूर्वी एका महत्वपूर्ण सीनची तयारी मोठ्या जोरात चालली होती. त्यासाठीच्या अॅक्शन सीनसाठी काही महिन्यांची तयारी संबंधितांकडून सुरु होती. मात्र, कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या समस्येमुळे तात्काळ त्यांना शूटिंग थांबवावं लागलं.

बॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...

'मॅट्रिक्स 4' हा 1 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रासह प्रसिद्ध अभिनेता केनू रीव्हस दिसणार आहे. प्रियांका आणि कियानू रीव्हस व्यतिरिक्त या चित्रपटात कॅरी एन मॉस, याह्या अब्दुल मतेन एल आणि नील पॅट्रिक हॅरिस यांच्याही भूमिका आहेत.

मालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...  

देसी गर्ल प्रियांकाने यापूर्वी हॉलीवूडमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिचे पुढचे प्रोजेक्ट कोणते असणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. काही महिन्यांपूर्वी प्रियांका मॅट्रिक्स 4 मध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणात भाग घेतला आणि काही दिवसांचे शूटिंग केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra starts shooting of her new hollywood movie, read full story