अजय देवगण आणि 'बिग बी' सात वर्षांनंतर एकत्र

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 7 November 2020

ज्यावेळी अजय देवगण या चित्रपटाच्या कथेवर काम करत होते त्यावेळी त्यांच्या डोक्यात सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांचे नाव आले.

 

मुंबई - बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन हे प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याच्या चित्रपटात काम करणार आहे. विशेष म्हणजे हे दोघेजण सात वर्षांनी एकत्र आले असून आता अजय दिग्दर्शित चित्रपटात बिग बी काम करणार आहे. याविषयीची अधिक माहिती एका चित्रपट समीक्षकाने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरुन शेयर केली आहे. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

प्रसिध्द चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याविषयीची अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ आणि अजय हे एकाच चित्रपटातून दिसणार आहे. त्या चित्रपटाचे नाव मेडे असे आहे. त्यात अजय एका पायलटच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही कलाकार सात वर्षानंतर एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी प्रकाश झा यांच्या सत्याग्रह चित्रपटातून काम केले होते.

या चित्रपटाविषयी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अजय देवगण हा करणार आहे. हे काम अमिताभ यांच्याबरोबर करण्याची त्याची पहिलीच वेळ असणार आहे. हैद्राबाद येथे डिसेंबर पासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.

तनुश्री म्हणे,' नानांसारख्या व्यक्तिला निर्माते काम देतात कसे'?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी अजय देवगण या चित्रपटाच्या कथेवर काम करत होते त्यावेळी त्यांच्या डोक्यात सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांचे नाव आले. मेडे ही एक प्रकारची ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा अजयने अमिताभ यांना चित्रपटाविषयी विचारणा केली तेव्हा त्यांनी त्याला लगेच होकार कळवला.

शेवंताबाईंची गोष्टच वेगळी होती,पम्मीचं तसं नाहीये'

अमिताभ यांना या चित्रपटाची कथा फार आवडली आहे. अजय व त्यांनी यापूर्वी मेजर साब, खाकी आणि सत्याग्रह या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मेडे या चित्रपटाची उर्वरीत कलाकार कुठले याची यादी फायनल झाली नसून येत्या काही दिवसांत ती फायनल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Producer and Director Ajay devgan work with big b Amitabha bachchan next movie