esakal | अभिनेता पुलकित सम्राट पुन्हा सज्ज झाला आहे हसविण्यासाठी; वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

pulkit

बिट्टू बॉस, फुकरे , फुकरे रिटर्न्स  आणि पागलपंती या चित्रपटामध्ये काम करणारा अभिनेता पुलकित सम्राट पुन्हा एकदा “सुस्वागतम खुशामदीद ” या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता पुलकित सम्राट पुन्हा सज्ज झाला आहे हसविण्यासाठी; वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः बिट्टू बॉस, फुकरे , फुकरे रिटर्न्स  आणि पागलपंती या चित्रपटामध्ये काम करणारा अभिनेता पुलकित सम्राट पुन्हा एकदा “सुस्वागतम खुशामदीद ” या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज झाला आहे. हा हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे. सध्या लॉकडाऊन असतानाही  पुलकितच्या खुशामदीदची घोषणा झाली आहे.

वाचा ः कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

'मेटा फोर फिल्म्स' आणि 'इनसाईट फिल्म' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती होणाऱ्या या चित्रपटाबरोबरच आणखी एका चित्रपटासाठी पुलकितला साईन करण्यात आले आहे. अल्प काळातच या फिल्म सरकारी नियमांचे पालन करीत यांचे चित्रीकरण सुरु होत आहे. फिल्म्सचे कथानक मनीष किशोर यांचे असून धीरज कुमार या फिल्मचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या तरी या फिल्मच्या चित्रीकरणासाठी लखनौ आणि दिल्ली ही ठिकाणे ठरविण्यात आली असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे .

वाचा ः लंडनहून भारतात परतेल्या मुलीची हृदयद्रावक कहाणी; आठ दिवसांनंतरही रिपोर्ट नाही, विमानसेवा आणि हॉटेलच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

फिल्ममधील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना पुलकित म्हणाला की, ही सर्व वयोगटासाठी, एकत्रित पाहण्यालायक कॉमेडी असून तिचा आस्वाद सर्व जण घेऊ शकतील. मला खात्री आहे की प्रेक्षक चित्रपटाच्या कथानकाशी नक्कीच एकरूप होतील. मलाही मोठी उत्कंठा आहे की प्रेक्षकांना पडद्यावर प्रेम, मैत्री आणि परस्पर स्नेहाची भाषा हलक्याफुलक्या अंदाजात सांगू शकेल.

वाचा ः आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात

दिग्दर्शक धीरज कुमार यांनी सांगितले की, शर्मन जोशी अभिनित 'काशी इन सर्च ऑफ गंगा'च्या दिग्दर्शनानंतर ही माझी फिल्म आहे. सुस्वागतम ही फिल्म प्रेक्षकांना कॉमेडीबरोबरच प्रेमाचा आणि मैत्रीचा संदेश देईल आणि मानवी नात्यांचे महत्व पुन्हा एकदा वेगळ्या शैलीत प्रतिपादित करील. लेखक मनीष किशोर यांनी कथेवर दीर्घकाळ काम केलंय. पुलकित एक पक्का दिल्ली बॉय असून दिल्लीच्या वातावरणाशी जुळवून घेणारा आहे. 

loading image