PIFF: पुणे फिल्म फेस्टिलव्हलवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट? लवकरच नवीन तारखांची घोषणा

पुणेकरांसाठी देखील पीफचे स्थान वेगळे आहे. या चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.
PIFF
PIFFesakal

Pune International Film Festival 2023 postponed : जगभरातील चित्रपट रसिक, अभ्यासक यांच्यासाठी मोठी पर्वणी असणारा चित्रपट महोत्सव म्हणून पीफ अर्थात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची ओळख आहे. गेल्या वर्षी पीफ पार पडला होता. मात्र त्यापूर्वी दोन्ही वर्षे पीफवर कोरोनाचे सावट होते.

पुणेकरांसाठी देखील पीफचे स्थान वेगळे आहे. या चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. मात्र यंदा पुन्हा एकदा पीफच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काही अपरिहार्य कारणास्तव पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

Also Read - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

PIFF
Shah Rukh Khan Pathaan: तो फक्त चित्रपटासाठी मंदिरात गेला नाही.. तर हिंदूंचे हे सणही करतो साजरा..

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाचा नवा व्हेरिंयंटचे सापडणे आणि त्यावरुन देशभरात भीतीचे वातावरण पसरणे हे दिसून आले आहे. कदाचित त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे.

PIFF
Manoj Muntashir On Pathaan: चूक दुरुस्त करण्याऐवजी ते.. लेखक मनोज मुंतशीरची 'पठाण'वर टीका..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com