Pushpa 2: बॉलीवूडमध्ये काम करशील? पुष्पा फेम अर्जुनचं 'फायर' उत्तर! |Pushpa 2 fame Allu Arjun comment on work in Bollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun look viral

Pushpa 2: बॉलीवूडमध्ये काम करशील? पुष्पा फेम अर्जुनचं 'फायर' उत्तर!

Pushpa 2: अल्लु अर्जुनच्या पुष्पाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूडमधील भल्याभल्यांची बोलतीच बंद झाली होती. तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटानं करुन नवा इतिहास आपल्या नावावर केला होता. गेल्या (Allu Arjun news) वर्षीच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या पुष्पानं चाहत्यांना आपलेसं केलं होतं. त्या चित्रपटाची लोकप्रियता प्रचंड होती. त्यातील गाणी, संवाद, छायाचित्रण हे सारं प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं. पुष्पा द राईज (Pushpa the rise 1) या पहिल्या भागानंतर त्याच्या दुसऱ्या पार्टचे प्रेक्षकांना वेध लागले होते. आता त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

नव्या वर्षांच्या सुरुवातीचे काही महिने पुष्पाचा हँगओव्हर होता. तो भलेही आता कमी झाला असेल. मात्र त्याच्या आगामी दुसऱ्या भागाचे वेध प्रेक्षकांना लागले (bollywood moies) आहे. पुष्पा हा ब्लॉकबस्टर झाला होता. त्यात अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. आता सोशल मीडीयावर अल्लुच्या पुष्पा 2 मधील लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्यानं मोनोक्रॉम फोटो व्हायरल केला आहे. त्यात लांब केसांचा तो लूक चाहत्यांना बराचसा भावला आहे.

चाहत्यांनी त्या फोटोंवर कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे की, कमालीचा प्रभावी लूक, आम्हाला आता पुष्पा 2 ची आतुरता आहे. टॉलीवूडमधल्या स्टार अल्लुच्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. पुष्पा 2 अल्लुचा लूक व्हायरल झाल्यानंतर काहीच वेळात अल्लु हा सोशल मीडीयावर ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. मात्र अल्लुनं या फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणतो, हरिश शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या एका कमर्शियलचा आहे.

यासगळ्यात माध्यमाच्या काही प्रतिनिधींनी महेश बाबुनं बॉलीवूडवर दिलेल्या प्रतिक्रियेविषयी अल्लुला विचारणा केली. त्यावर तो म्हणाला, हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे हे माझ्यासाठी देखील अवघड गोष्ट आहे. पहिलं म्हणजे तुम्ही त्या भाषेशी संबंधित हवे. तुम्हाला ती बोलता आणि वाचता येणं जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यामुळे मी त्या भाषेतील चित्रपटात कसं काम करेल, ते माझ्या क्षमतेबाहेरचं काम आहे. पण एखादी कथा खूपच प्रभावी करुन गेली तर मी माझा विचारही बदलेल. असं अल्लु म्हणाला.

हेही वाचा: Pushpa 2: मनोज वाजपेयीनं पुष्पाच्या अल्लु अर्जुनला ऐकवलं, 'भाऊ मी नेहमीच...'

यापूर्वी बॉलीवूडमध्ये काम करण्यावर किच्चा सुदीप, महेश बाबू, रामचरण, कमल हासन यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वात बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष रंगल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये देखील दोन गट तयार झाले आहे.

हेही वाचा: Pushpa 2 : 'पुष्पा २' लवकरच.. पण श्रीवल्लीचं काय? निर्माते म्हणाले..

Web Title: Pushpa 2 Fame Allu Arjun Comment On Work In Bollywood Movies Actor New Look Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..