श्रीवल्लीचं मराठी वर्जन करणाऱ्या विजय खंडारेचं नवं गाण रिलीज | New Song Released | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new song

श्रीवल्लीचं मराठी वर्जन करणाऱ्या विजय खंडारेचं नवं गाण रिलीज

कोणतेही नवीन गाणे लोकांना आवडायला लागले की त्याचे बरेच वर्जन तयार होतात. अशातच पुष्पा चित्रपटाचे श्रीवल्ली या गाण्याला तर लोकांनी तर डोक्यावर ओढून घेतले होते. मग या फेमस गाण्याचे अनेक भाषेत अनेक वर्जन करण्यात आले. यातलंच एक मराठी वर्जन लोकांना खूप आवडलं. हे मराठी वर्जन करणारे अमरावतीचे विजय खंडारे त्यावेळी खुप चर्चेत आले. याच विजय खंडारे यांचं एक नवीन गीत प्रेक्षकांच्या भेटीला आहे

हेही वाचा: Kesariya Song: ब्रह्मास्त्रचं 'केसरिया' चोरलेलं गाणं? संगीत चोरीचा आरोप

श्रीवल्लीचे मराठी वर्जन फेमस झाल्यानंतर विजय खंडारे यांच्या या नवीन गाण्याची बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. अमरावती प्रस्तुत विदर्भातील कलाकारांची कलाकृती "शेवटचं पान" हे गीत ७ तारखेला तापडिया सिटी सेंटर येथे प्रदर्शित करण्यात आले आणि एका दिवसात दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी या गाण्याला Youtube वर प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हे गाणे Youtube वर चांगलेच व्हायरल होत आहे.

या गीताचे दिग्दर्शन रोहित काळे तसेच मयूर बर्डे असून संगीत संयोजन श्रीनिवास मोहोड यांनी केले आहे तर या गाण्याचे गायक विनय वानखडे असून या गाण्याचे गीतकार निखिल लिघाटे आणि विनय वानखडे यांनी दिले आहे. या गीताचे चित्रगीकरण मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावी तसेच महाराष्ट्र सीमेला लागलेल्या मध्य प्रदेशातील नळा मानी या गावी झाले आहे..

हेही वाचा: Liger Song Aafat Out: आफत ! विजय आणि अनन्याची हॉट केमिस्ट्री अन् बरंच काही...

विशेष म्हणजे गाण्याच्या मुख्यभुमिकेत श्रीवल्ली मराठी वर्जन करणारे विजय खंडारे हे झडकणार आहे तसेच त्यांच्या साथीला सृष्टी गाडगे या असणार आहेत. सह कलाकार - मनीष पतंगराव हे आहेत. हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला विजय खंडारे यांच्या यूट्यूब चॅनल वर येणार आहे.

विजय खंडारे यांच्या या नव्या गाण्याला प्रेक्षक श्रीवल्ली सारखाच प्रतिसाद देईल का, हे पहावे लागेल पण सध्या या गाण्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Pushpa Movie Srivalli Song Marathi Version Amravati Vijay Khandare New Song Released Shevatche Paan Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..