Liger Song Aafat Out: आफत ! विजय आणि अनन्याची हॉट केमिस्ट्री अन् बरंच काही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liger Song Aafat Out

Liger Song Aafat Out: आफत ! विजय आणि अनन्याची हॉट केमिस्ट्री अन् बरंच काही...

बऱ्याच काळापासून चर्चेत असणाऱ्या लायगर चित्रपटाचं दुसरं गाणं नुकतंच रिलीज झालंय. या गाण्यात विजय आणि अनन्याची हॉट केमिस्ट्री तुम्हाला बघायला मिळेल. या गाण्याला काही वेळातच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले . लायगर या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जोरदार उत्सुकता आहे. विजय आणि अनन्याच्या या नव्या गाण्यात त्यांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय. (Vijay Deverkonda and Ananya panday second song Aafat out now)

लाइगर ट्रेलरला लोकांनी भलतच पसंत केलं आहे. विजय देवरकोंडाची अॅक्शन आणि अनन्यासोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडलेली दिसत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये आणि अनन्या पांडेचं साऊथमध्ये पदार्पण होत आहे. दोघांनीही या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीच कसर ठेवलेली नाही. नुकतेच हे दोघे बान्द्रा परिसरात प्रमोशन करताना दिसले. या दरम्यान त्यांनी मुलांसोबत डान्सही केला.

आता लायगरचं आफत हे नवं गाणं रिलीज होताच चाहत्यांची येणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. आफत हे गाणं युट्यूबवर रिलीज होताच विजयच्या चाहत्यांनी कमेंट करत विजयचं कौतुक केलंय.

या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करणार आहे. विजय देवरकोंडानं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यासोबत अभिनेत्री सारा अली खाननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टर मध्ये विजय न्यूड लुक मध्ये दिसतो. त्याशिवाय या पोस्टरवर 'साला क्रॉसब्रिड' असं देखील लिहिलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नेमकं काय असेल असं प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Web Title: Vijay Deverakonda And Ananya Panday Liger Second Song Aafat Out Now See Their Romantic Chemistry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..