The Vaccine War: माझं डोकं सुन्न झालंय... विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' पाहून आर. माधवनची पहिली प्रतिक्रिया

अमेरिकेत 'द व्हॅक्सीन वॉर' पाहून आर. माधवनने प्रतिक्रिया दिलीय
r madhavan comment on the vaccine war vivek agnihotri at america screening
r madhavan comment on the vaccine war vivek agnihotri at america screening SAKAL

R Madhvan On The Vaccine War News: विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनींग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रिनींगमध्ये आर. माधवन उपस्थित होता. आर. माधवनची सिनेमा पाहून पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

(r madhavan comment on the vaccine war vivek agnihotri at america screening)

r madhavan comment on the vaccine war vivek agnihotri at america screening
Subhedar: गाजतोय सिंहगडाचा पोवाडा! रविवारी सुभेदारच्या कमाईची कोटीच्या कोटी उड्डाणे, पाहा कमाईचे आकडे

आर माधवनने केलं 'द व्हॅक्सिन वॉर'चं कौतुक

आर माधवनने लिहिले, "नुकताच 'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमा पाहिला. भारतीय वैज्ञानिक समुदायाचा त्याग आणि यशाने माझं डोकं सुन्न झालंय. ज्यांनी भारताची पहिली लस बनवली आणि अत्यंत आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवले, असे एका मास्टर स्टोरीटेलरने सांगितले. हा सिनेमा पाहताना तुम्ही एकाच वेळी जयजयकार करता, टाळ्या वाजवता, रडता आणि जल्लोष करता. संपूर्ण कलाकारांचे अभिनय परफॉर्मन्स, आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचा (स्त्रिया) त्याग आणि धैर्य यांचे योग्य आणि प्रभावशाली चित्रण इतके सुंदर आहे. तुम्ही आताच्या आता #TheVaccineWar ची तिकिटे बुक करा आणि लॉकडाऊन मध्ये आपल्यासाठी ज्या महिलांनी त्याग केलाय, त्यांना सन्मान द्या."

द व्हॅक्सीन वॉर सिनेमाची घोषणा

विवेक अग्निहोत्री चित्रपटाचे नाव द व्हॅक्सीन वॉर असे असून त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अग्निहोत्री यांनी तो टीझर प्रदर्शित केला असून त्याला प्रेक्षकांचा,नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काहींनी अग्निहोत्री यांच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या तारखेला होणार 'द व्हॅक्सिन वॉर' रिलीज

देशातील डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी कोविडच्या काळात कशाप्रकारे काम केले, कोणकोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला, त्यांनी व्हॅक्सीनची निर्मिती कशी केली याविषयीची मांडणी या चित्रपटातून कऱण्यात आली आहे. द व्हॅक्सीन वॉर ही भारतातली पहिली बायो सायन्स फिल्म असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातून भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या प्रवासाविषयी सांगण्यात येणार आहे.

टीझरसोबत दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com