The Vaccine War Teaser: 'काश्मीर फाईल्स'नंतर पुन्हा अग्निहोत्रींचा पुन्हा मोठा दणका! 'द व्हॅक्सीन वॉर'ची घोषणा

अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी द व्हॅक्सीन वॉरबाबत सांगितले होते. द काश्मीर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
The Vacine War Teaser
The Vacine War Teaser esakal

The Vacine War Teaser : द काश्मीर फाईल्समुळे चर्चेत आलेल्या विवेक अग्निहोत्री यांच्यावर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या विचारसरणीचा प्रचारक म्हणून टीका केली जाते. त्यामुळे त्यांना कित्येकदा त्यावरुन ट्रोलही केले गेले आहे. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी द व्हॅक्सीन वॉरबाबत सांगितले होते. द काश्मीर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तो चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी खास सुट्टी देण्यात आली होती. देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी देखील त्या चित्रपटाचे कौतूक केले होते. नागरिकांनी तो चित्रपट पाहावा असे आवाहनही केले होते. अशातच अग्निहोत्री यांच्यावर मात्र नेटकऱ्यांनी आगपाखड केली होती.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

अग्निहोत्री यांनी देखील चित्रपटाला नावं ठेवणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले होते. आता ते एका वेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्या चित्रपटाचे नाव द व्हॅक्सीन वॉर असे असून त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अग्निहोत्री यांनी तो टीझर प्रदर्शित केला असून त्याला प्रेक्षकांचा,नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काहींनी अग्निहोत्री यांच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

गेल्या वर्षी द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात काश्मीरच्या खोऱ्यातील कश्मिरी पंडितांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली तसेच त्यांना हाकलण्यात आले याविषयी दिग्दर्शकानं प्रभावीपणे काश्मीर फाईल्समध्ये भाष्य करण्यात आले होते. आता द व्हॅक्सीन वॉरमध्ये एका वेगळ्याच विषयाला अग्निहोत्री यांनी तोंड फोडले आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्यांनी रिलीज डेटही सांगितली आहे.

The Vacine War Teaser
Gadar 2 Twitter Review: सनी हे काय केलसं रे भावा ! गदर 2 पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणताय..

देशातील डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी कोविडच्या काळात कशाप्रकारे काम केले, कोणकोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला, त्यांनी व्हॅक्सीनची निर्मिती कशी केली याविषयीची मांडणी या चित्रपटातून कऱण्यात आली आहे. द व्हॅक्सीन वॉर ही भारतातली पहिली बायो सायन्स फिल्म असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातून भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या प्रवासाविषयी सांगण्यात येणार आहे.

The Vacine War Teaser
Sunny Deol Gadar 2 : तारा सिंगनं निराशा केली, चित्रपट पाहून डोकेदुखी वाढली! नेटकरी नाराज

टीझरसोबत दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचवेळी प्रभासचा सालारही प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठा क्लॅश होणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com