
वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून आर माधवन हा प्रेक्षकांना परिचित आहे. रहेना है तेरे दिल में या चित्रपटाच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. आर माधवन हा केवळ अभिनेता नाही तर समाजातील चूकीच्या गोष्टींवर ठाम भूमिका घेणारा कलावंत आहे.
मुंबई - वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून आर माधवन हा प्रेक्षकांना परिचित आहे. रहेना है तेरे दिल में या चित्रपटाच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. आर माधवन हा केवळ अभिनेता नाही तर समाजातील चूकीच्या गोष्टींवर ठाम भूमिका घेणारा कलावंत आहे. अर्थात त्याला त्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं आहे. मात्र आपल्या वक्तव्याशी प्रामाणिक असणं हे त्याला जमलं आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या आर माधवन ट्रोल होताना दिसत आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्याच्यावर नशेबाज असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तो चांगलाच वैतागला आहे. आपल्याला नावं ठेवणा-यांना त्यानं चांगलेच सुनावले आहे. मंगळवारी आर माधवनला काही व्टिटवरुन काहीजणांनी ट्रोल केले. त्यात तो नशापाणी करत असल्याचा आरोप काहींनी केला. माधवन हा ड्रग अॅडिक्ट असून तो अल्कोहोलिक असल्याचेही म्हटले होते. या आरोपांना माधवनने सणसणीत उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, माझ्यावर अशा पध्दतीचे जे कुणी आरोप करत आहे त्यांची मला कीव येते.
एखाद्या चांगल्या कलाकाराचे करियर कसे धुळीला मिळेल याची काळजी ट्रोलर्स घेतात. आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र अनेकदा त्यांना सांगावे लागते की, तुम्ही जे काही करत आहात ते चूकीचे आहे. तुमच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे त्या कलाकाराला मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसु शकतो. मला अनेक चित्रपटांमध्येही काम न मिळण्याचे कारण म्हणजे माझ्यावर नशेबाज असल्याचा शिक्का मारला गेला आहे. तो कसा हे काही कळायला मार्ग नाही. सोशल मीडियावर कुणालाही सहजपणे बदनाम केले जाते. बदनाम करणारे कसलाही विचार करत नाही. यावेळी मला प्रचंड संघर्षातून जावे लागले. आता जे कोणी माझ्यावर आरोप करत आहे त्यांना माझे सांगणे आहे की, मला ड्रग्ज अॅडिक्ट म्हणत असाल तर मग तुम्हालाच डॉक्टरांची गरज आहे.
गरोदरपणात अनुष्काचं ट्रेडमिलवर जॉगिंग ; व्हिडिओ केला शेयर
माधवन याची प्रमुख भूमिका असलेला मारा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. माधवनला ट्रोल करताना असे लिहिण्यात आले होते की, मॅडीनं नशापाणी करण्याच्या नादात त्याचे करियर बिघडवून टाकले. त्यानं त्याच्या प्रकृतीचा फारसा विचार केला नाही. आणि त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. तो अल्कोहोल आणि ड्रग्जच्या पूर्ण आहारी गेला होता. ज्यावेळी त्यानं रेहना है तेरे दिल में चित्रपटातून पदार्पण केले होते तेव्हा त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र व्यसनानं त्याचा घात केला.
मुळशी पॅटर्न’ नंतर आता ‘जग्गु आणि Juliet’ ची उत्सुकता
माधवनला त्याच्या चाहत्यांनी यावेळी आधार दिला आहे. काहीही झालं तरी तु आमचा आवडता मॅडी आहे. अशा शब्दांत त्याची स्तुती केली आहे. तुला जे कोणी अशा पध्दतीनं टीका करुन त्रास देत आहेत त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नकोस. नकारात्मकतेला थारा न देता सकारात्मकतेचा विचार कर असे त्याला त्याच्या फॅन्सनं सांगितले आहे.
Edited By - Prashant Patil