'आवाज खाली, शिस्तीत बोलायचं', रघु भडकला होता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raghu Ram

'आवाज खाली, शिस्तीत बोलायचं', रघु भडकला होता...

ज्यावेळी रघु (raghu) इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमध्ये ऑडिशनसाठी गेला होता तेव्हा त्याला अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. ते त्यानं सांगितलं आहे. जेव्हा त्याचं गाण फरहा (farha), सोनू (sonu nigam)आणि अनु मलिकनं (anu malik) गायलं होतं तेव्हा त्यानं यापुढे गाऊ नये असे त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्याला त्या जजेसचे वागणे आणि बोलणे आवडले नव्हते. तसे त्याने ते परखडपणे त्यांना सांगितलेही. गंमतीची गोष्ट अशी की रघु जेव्हा एमटीव्हीवरील रोडिज कार्यक्रमामध्ये इतरांच्या ऑडिशन्स घेतो तेव्हा तो ही इतरांना अपमानित करत असल्याचे दिसून आले आहे.

रघुनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचे गाणे ऐकल्यानंतर फराह नाराज होते. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला दोन मिनिटांचा वेळ दिला आहे. त्यात अशाप्रकारे कोणी परफॉर्मन्स देत असेल तर त्याला काही अर्थ नाही असे तिचे मत होते. तु तुझे 30 सेकंड वाया घालवले असेही तिनं सांगितलं. आज जाने की जिद ना करो हे गाणं रघुनं गायलं होतं.

त्याचं ते गाणं त्या सर्व परीक्षकांना आवडलं नव्हतं. सोनू निगम त्याला विचारतो की, तुझे गाणे मला आवडले नाही. हे तुझं सर्वोत्तम गाणं होतं का, हे गाणं तु निवडलं होत का, त्यावर रघु म्हणतो नाही. पण मला वाटलं तुम्हाला ते आवडेल. मला गाण्यापूर्वी थोडा वेळ लागतो. त्यावर फराहनं त्याला सांगितलं. त्यासाठी एवढा वेळ, माझ्या व्यंगावर तुम्ही हसु नका.

हेही वाचा: वयाच्या ४६व्या वर्षी फिटनेस, सौंदर्याने भुरळ पाडणारी शिल्पा शेट्टी

हेही वाचा: Photo: 'बबड्या'चा 'गजनी' लूक सोशल मीडियावर चर्चेत

तु जेवढं स्ट्रेचिंग केलं, तेवढा सूर स्ट्रेच झाला नाही. अशी प्रतिक्रिया अन्नु मलिक यांनी दिली. मला एवढचं सांगायचे आहे की, तुला गाता येत नाही आणि तु मुंबईला येऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही शिस्तीत सांगु शकला असता, तुम्ही खुप रुड आहात. मला हे आवडले नाही. सगळ्यात शेवटी रघुनं सांगितलं की, हे सारे प्रँक होते.

Web Title: Raghu Ram Indian Audition Viral When He Asked Anu Malik To Stop Being

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..