esakal | माझ्या राहुलच्या मृत्युला जबाबदार कोण, राहुलच्या पत्नीचा सवाल?
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul vohara

माझ्या राहुलच्या मृत्युला जबाबदार कोण, पत्नीचा सवाल?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द अभिनेता राहुल वोहरा (Rahul Vohara) याचे कोरोनामुळे निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपला शोक व्यक्त केला. राहुलनंही त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन मरण्यापूर्वी एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे त्याच्या निधनानंतरही तो चर्चेत आला आहे. आपला मृत्यु हा कोरोनानं नाहीतर उपचारातील चूकीमुळे झाला आहे असं त्यानं म्हटलं आहे. दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये (Rajiv gandhi super speciality hospital) त्याला दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यानं अखेरचा श्वास घेतला होता.

राहुलनं (Rahul Vohara) जगाचा निरोप घेण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केले होते की, मला जर चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर मी वाचलो असतो. त्यानंतर आता त्याच्या पत्नीनं ज्योती तिवारीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं राहुलचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्यात राहुलनं आपल्याला कशाप्रकारे उपचार मिळाले याची माहिती शेअर केली आहे. यावेळी त्यानं त्या रुग्णालयातील बेजबाबदारपणावरही बोट ठेवले आहे. आता त्याच्या पत्नीनं अभिनेता राहुलच्या न्यायासाठी आवाज उठवला आहे.

ज्योतीनं तिच्या सोशल मीडियावर लिहिलं आहे की, माझा राहुल आता आपल्यातून गेला आहे. मात्र तो कसा गेला हे कुणालाही माहिती नाही. त्याच्यावर राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु होते. मला आशा आहे की माझ्या नव-याला आता न्याय मिळेल. तो या जगातून जायला नको होता. ज्योतीनं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती राहुलला मास्क लावताना दिसत आहे.

हेही वाचा: "फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही तर.. "; 'जेठालाल'ची विनंती

हेही वाचा: सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरलाही झाला कोरोना

त्यावेळी राहुल ते मास्क लावताना सांगतो की, सध्या मास्कची किंमत मोठी आहे. त्याचे महत्व आपण समजून घेण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय काही खरे नाही. मात्र आता यातून ऑक्सिजन काही येत नाही. ती नर्स आली होती. मी तिला सांगितलेही होते. ती फक्त त्या बाटलीत पाणी भरून निघून गेली. सगळं काही विचित्र आहे. त्यांना आपल्याला आवाज द्यावा लागत आहे. अशा शब्दांत राहुलनं आपली वेदना मांडली होती.