Raj Kapoor च्या चेंबूरमधील ऐतिहासिक बंगल्याचा सौदा पक्का, 'हे' आहेत नवे मालक अन् असं पलटणार बंगल्याचं रुपडं

राज कपूर हयात असताना चेंबूरमधील या बंगल्यात कपूर कुटुंबासोबत अख्खी इंडस्ट्री अनेक उत्सव साजरे करायला एकत्र जमायची.
Raj Kapoor Chembur Bungalow sold
Raj Kapoor Chembur Bungalow soldGoogle

Raj Kapoor Chembur Bungalow sold: मनोरंजन जगतातील दिवंगत अभिनेता राज कपूर यांचा ऐतिहासिक बंगला अखेर आज विकला गेला. हा बंगला मुंबईच्या अतिशय उच्चभ्रू लोकांच्या वस्तीत वसलेला आहे.

या बंगल्याला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीनं खरेदी केलं आहे. हा बंगला १०० करोडला विकला गेल्याचं कळत आहे...किंमत जास्तही असू शकते असा अंदाज लावला जातोय. मे २०१९ मध्ये गोदरेजनं राज कपूर यांच्या आर के स्टुडिओला देखील खरेदी केलं होतं.(Raj Kapoor Chembur Bungalow sold)

Raj Kapoor Chembur Bungalow sold
Shehzada Ticket: कार्तिकच्या 'शहजादा'नं लढवली शक्कल, बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'पठाण'ला अशी चारणार धूळ

गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड कंपनीनं म्हटलं आहे की,'' दिग्गज अभिनेते,दिग्दर्शक,निर्माता राज कपूर यांच्या मुंबईतील चेंबूर येथील बंगल्याला आम्ही खरेदी केलं आहे. कंपनीच्या योजनेनुसात आता याठिकाणी एक लक्झुरियस अपार्टमेंट्स उभारण्यात येणार आहेत. कंपनीनं ही जमीन राज कपूर यांचे कायद्याने जे वारस आहेत त्या कपूर कुटूंबाकडून खरेदी केली आहे''.

गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी चेअरमन पिरोजशा गोदरेज यांनी पीटीआयला सांगितले की,''या भूखंडावर आम्ही लक्झुरियस अपार्टमेंट उभारणार आहोत. तर ''आम्हाला कपूर कुटुंबानं ही प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी दिली यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत..'',असं कंपनीचे सीईओ गौरव पांड्ये म्हणाले.

Raj Kapoor Chembur Bungalow sold
Shehzada Twitter Review: 'शहजादा' हिट की फ्लॉप!, काय म्हणतायत लोक?
Raj Kapoor Chembur Bungalow sold
Urfi javed: मोटरबाईकचं सीट कव्हर काढून अंगावर घातलं बयेनं..आता गाडीचं काय करायचं..

चंबूरमध्ये बंगल्याच्या भूखंडाचं बाजार मूल्य जवळपास १०० ते ११० करोड इतकं असल्याचं बोललं जात आहे. चेंबूर बीकेसी सोबत जोडला गेलाय त्यामुळे ही जमेची बाजू आहे.

दिवंगत राज कपूर यांचे चिरंजीव आणि अभिनेता रणधीर कपूर यांनी या व्यवहाराविषयी बोलताना सांगितलं की,''चेंबूरमधील आमच्या या जागेशी आम्ही सगळे भावनात्नकदृष्टया जोडलेलो आहोत. आमच्यासाठी याचं ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. आम्ही देखील या निमित्तानं गोदरेज प्रॉपर्टीशी जोडले गेलोय याचा आम्हाला आनंद आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com