Raj Kundra: 'कुठून येतात असे नमुने' फेस मास्कसाठी शिल्पाचा नवरा पुन्हा ट्रोल

शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखी जाते. शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर तिच्या व्यायामाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
Raj Kundra
Raj Kundrasakal

बॉलीवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अनेकजण तिची कौतुक करताना थकत नाहीत, मात्र कधी-कधी अभिनेत्रीला पतीमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

आता अलीकडेच, राज कुंद्राचा एक लेटेस्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राज स्टायलिश काळ्या रंगाच्या फेस मास्कमध्ये दिसत आहे. आता पुन्हा एकदा त्याला इंटरनेटवर ट्रोल केले जात आहे.

विशेष म्हणजे, अश्लील व्हिडिओ बनवण्याच्या प्रकरणानंतर राज कुंद्रा सतत युजर्सच्या निशाण्यावर येत आहेत. या प्रकरणापासून राज कुंद्रा फेस मास्क घालून मीडियामध्ये दिसत आहे. आता अलीकडेच शिल्पा पती राज कुंद्रासोबत डिनर डेटवर जाताना दिसली.

हा व्हिडिओ एका चाहत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राज चेहऱ्यावर मास्क घालून कारमधून खाली उतरताना दिसत आहे आणि वेगाने चालतानाही दिसत आहे.

Raj Kundra
Kareena Kapoor: 'एक बार हात लगाने दो' हातमिळवणी करण्यास करीनाचा नकार..अन् सोशल मिडियावर ट्रोलिंगला सुरवात...

राज कुंद्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्समध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सनी त्याच्यावर निशाणा साधला असून, त्यामुळे राज कुंद्रा सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. एका यूजरने कमेंट केली की, 'त्याच्यासोबत काय चुकीचे झाले आहे, की तो चेहरा दाखवू शकत नाही.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'अशा गोष्टी का करता की तुम्हाला तुमचा चेहरा लपवावा लागतो.'

एकीकडे शिल्पा तिच्या फिटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. दुसरीकडे, तिचा पती राज कुंद्रा त्याच्या कृत्यांमुळे यूजर्सच्या निशाण्यावर येत आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या शिल्पा रिअॅलिटी शोज जज करताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com