Raj Thackeray: "चंकु सर असं काही नसतं!"; भाषणादरम्यान राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेचे टोचले कान,पाहा व्हिडीओ

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी कार्यक्रमात केलेल्या भाषणात संकर्षण कऱ्हाडेला कलाकारांच्या नावाच्या उल्लेखाबाबत सांगितलं.
Raj Thackeray,Sankarshan Karhade
Raj Thackeray,Sankarshan Karhade Esakal

Raj Thackeray: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी काल (27 फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी नाटकं, चित्रपट ह्यांची माहिती आणि तिकीट आरक्षित करण्यासाठी 'तिकिटालय' हे अ‍ॅप लाँच केलं. हे अ‍ॅप लाँच करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणात संकर्षण कऱ्हाडेला कलाकारांच्या नावाच्या उल्लेखाबाबत सांगितलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

'तिकिटालय' या अॅपच्या लाँचिंगच्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले, "संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर ‘चंकू सर’ असं काही नसतं. मी चंद्रकांत कुलकर्णी सर समजू शकतो. त्यामुळे इथून पुढे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे. "

पुढे राज ठाकरे म्हणाले, "त्यादिवशी मी श्रीरंग गोडबोले यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं की, परवा दिवशी मी कॅफे गूड लकमध्ये गेलो होतो आणि तिथे मी सांगितलं की, दोन ‘आनंदरावांची ओमेल्ट’ द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर…” राज ठाकरेंचे हे वाक्य ऐकल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोक खळखळून हसले.

Raj Thackeray,Sankarshan Karhade
Raj Thackeray : "कोकणचं कॅलिफोर्निया बनवण्याची स्वप्न दाखवलं अन् मग.. "राज ठाकरेंनी उल्लेख केलेली 'बेवॉच' सीरिज नेमकी आहे तरी काय?

राज ठाकरेंनी शेअर केला व्हिडीओ

राज ठाकरेंच्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "ज्येष्ठ अभिनेते श्री. प्रशांत दामले ह्यांनी मराठी नाटकं, चित्रपट ह्यांची माहिती आणि तिकीट आरक्षित करण्यासाठी 'तिकिटालय' हे अ‍ॅप आज 'मराठी भाषा गौरव दिना'च्या निमित्ताने सुरु केलं. ह्या नव्या कल्पनेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ह्या कार्यक्रमात बोलताना मी माझं मत सांगितलं की जो पर्यंत मराठी सिनेमा, नाटक हे वेगळा आणि भव्य-दिव्य विचार मांडणार नाहीत, कात टाकणार नाहीत आणि जे त्यांना टीव्हीच्या पडद्यावरही सहज दिसत नाही ते प्रत्यक्षात कलाकृतीत दिसेल तोपर्यंत प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत नाहीत, देणार नाहीत. बाकी मराठी भाषेसाठी, ती वृद्धिंगत व्हावी ह्यासाठी ज्या ज्या कल्पना राबवल्या जातील ह्यासाठी मला कधीही गृहीत धरलं तरी चालेल असं मी आवर्जून सांगितलं. बाकी 'तिकिटालय' अ‍ॅपला माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा !

पाहा व्हिडीओ:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com