'पानिपत'ची लढाई आशुतोष जिंकणारच! : राज ठाकरे

Raj Thackeray tweets about Panipat trailer
Raj Thackeray tweets about Panipat trailer

मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटमुळे!

राज ठाकरे व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चांगसली मैत्री आहे. राज ठाकरे कोणत्याही कलेला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नुकताच त्यांनी 'पानिपत'चा ट्रेलर बघितला व गोवारीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या लढाईवर आशुतोष गोवारीकर चित्रपट काढत आहे, याचा ट्रेलर मी नुकताच बघितला. ट्रेलर इतका सुंदर आहे की, चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे, हा चित्रपट नक्की बघा. असे ट्विट राज यांनी केले आहे.

मराठी चित्रपटांमागे नेहमीच ठामपणे उभे राहणाऱ्या व मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांनी हिंदी चित्रपट 'पानिपत'बाबत ट्विट केल्याने त्यावर चर्चा होत आहे. तर आशुतोष गोवारीकर हे मराठी आहेत, मराठा साम्राज्यासाठी सर्वांत महत्त्वाची असलेली पानिपतची लढाई गोवारीकर मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांना हा ट्रेलर व चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे.  

'पानिपत'बाबत...
'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांचे लूक्स संजय दत्तने शेअर केले होते, त्यामुळे हा चित्रपट कसा असेल याबाबत सगळ्यांनाचा उत्सुकता होती. पानिपतात मराठ्यांच्या वाट्याला जरी पराभव आला असला, तरी तो पराभव आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून गेला आहे. याच युद्धभूमीची गोष्ट सांगणार पानिपत यशस्वी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर साकारत आहेत. 

सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेत अर्जून कपूर तर पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन हुबेहुब बसले आहेत. सोशल मीडियावर चर्चा रंगली होती, ती म्हणजे संजय दत्तने साकारलेल्या अहमद शाह अब्दालीची. पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होता. 

तीन मिनिटे चौदा सेकंदाचा हा ट्रेलर पुन्हा आपल्याला पानिपतच्या त्या युद्धभूमीवर घेऊन जातो. मराठ्यांनी सांडलेलं रक्त, बाजीराव पेशव्यांनी पानिपतच्या लढाईसाठी सदाशिवरावांची केलेली निवड, सुख-दुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी पार्वतीबाई व करारी नजरेने समोर उभा ठाकलेला अहमद शाह अब्दाली! या सगळ्याची सांगड घालत युद्धभूमीवरच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी आकर्षण असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com